Mother Health: बाळंतपणानंतर वजन का वाढतं? वाढल्यास ते लगेच कमी करणे बाळासाठी ठरेल...

वजन कमी करण्याची घाई करत तुम्ही केलेल्या चुकांचा तुमच्या बाळावर होतो वाईट परिणाम
Mother Health
Mother Healthesakal
Updated on

Mother Health Care: बाळांतपणात अनेक स्त्रीयांचं वजन वाढतं. अनेक स्त्रीया त्यांच्या स्लीम ड्रिम फिगरनंतर बाळंतपणात जेव्हा लठ्ठ होतात तेव्हा त्यांना बॉडी शेमिंग व्हायला लागते. त्यामुळे बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी लगेच काही दिवसांत जिमला जाणे, पौष्टिक पदार्थ कमी खाणे यांसारख्या चुका स्त्रीया करत असतात. मात्र या चुकांचा तुमच्या बाळाच्या प्रकृतीवर काय परिणाम होऊ शकतो याची जाणीव तुम्हाला आहे काय?

आई झाल्यावर वजन का वाढतं?

आईच्या पोटातून बाळाला सगळं काही पोषणयुक्त मिळावं म्हणून आई होणाऱ्या स्त्रीला जास्तीत जास्त पोषक आहार दिल्या जातो. त्यामुळे त्यांच्या वजनात भर पडणे हे साहाजिक आहे. त्यामुळे बाळंतपणात तुमचं वजन वाढलंय म्हणून काळजी करण्यचं कारण नाही.

मुळात बाळांतपणानंतर सहा-आठ महिने, काहींना वर्ष दोन वर्षेही वजनवाढीचा त्रास होवूच शकतो. त्यामुळे घाबरुन जायची गरज नसते.

वजन कमी करण्याची घाई करू नका, बाळाला होईल त्रास

बाळंतपणानंतर लगेच वजन कमी करण्याची घाई करू नका. तुमच्या आरोग्याला ते धोक्याचं ठरू शकतं. पण तरी मात्र अनेक स्त्रीया हे विसरत वजन कमी करण्याच्या मागे लागल्या असतात.

Mother Health
Mother's Day: अनाथांची माय! सिंधूताईंना गरोदरपणात नवऱ्याने घरातून हाकललं होतं; वाचा माईची अंगावर काटा आणणारी कहानी

यामागे सोशल मीडियावर चालत असलेल्या चर्चाही तेवढ्याच कारणीभूत असतात. अमूक अभिनेत्रीने डिलिव्हरीनंतर लगेच वजन कमी केलं तर अमूक अभिनेत्रीने बाळंतपणानंतर अवघ्या दिवसांत पुन्हा कामाला सुरूवात केली या सगळ्या सोशल मीडियावरील चर्चांचा प्रभाव खऱ्या आयुष्यातील महिलांवरही होत असतो. मात्र असे असले तरी विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला बाळंतपणानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. तरी तिने तिचं वजन लपवलं नाही. अलीकडेच ट्रोल झालेल्या करीना कपूरनेही पोट सुटलेलं दिसलं तरी दिसलं म्हणत आपलं जगणं बदललं नाही.

Mother Health
Health : सलाड खाताय, हे आहेत फायदे

मुळात शास्त्रीय माहिती न घेता आपल्या शरीरावर केलेल्या प्रयोगाचा आपल्या बाळावर काय परिणाम होईल, आपल्या शरीरावर काय परिणाम होइल याचा विचार करायला हवा. मूल अंगावर पीत असताना किमान सहा महिने तरी आपल्या आणि बाळाच्याही पोषणाचा विचार करायला हवा. नाही तुमच्या अंगावरील दूध पिणाऱ्या तानुल्या बाळालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील. तुम्ही वजन कमी करण्याच्या नादात कमी खात असाल तर निश्चितपणेही बाळाच्याह आहारातही फरक पडेल.

Mother Health
Health : गरोदरपणात कोल्ड्रिंक पिताय, मग हे वाचा

बाळंतपणानंतर आईने काय खावे?

गुळ भाकरी, तीळाची, जवसाची चटणी हे पदार्थ आपला आहार सांभाळून, वजन आणि पोषण दोन्ही उत्तम ठेवण्यास मदत करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()