Weight Loss Diet : बरेच प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही? आहारातला हा लहानसा बदल करेल जबरदस्त परिणाम

हल्ली वजन वाढणे ही फारच कॉमन समस्या झाली आहे.
Weight Loss Diet
Weight Loss Dietesakal
Updated on

Diet Change For Weight Loss : कामाच्या पद्धती, बदलती जीवनशैली आणि सतत वाढत जाणारा ताणा या सगळ्याचाच परिणाम म्हणजे वाढते वजन. ही समस्या शहरी भागातच अधिक प्रमाणात वाढत असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे. याबाबत आयुर्वेदात काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, जाणून घेऊया.

Weight Loss Diet
Weight Loss Dietesakal

माणूस जे अन्न खातो त्यातून त्याला कोणते घटक मिळतात हे माणसाला ओळखणे शक्य आहे. जसे, साखर फळांमधून आली की त्याला fructose म्हणतात, उसामधून आली की तिला सुक्रोज म्हणतात, दुधातून आली की लॅक्टोज म्हणतात. तसंच काहीतूम अमायनो अॅसिड, फॅटी अॅसिड असतो. १०० पैकी ७५ लोकांमध्ये आपण खातो तेवढी शुगर पचवण्याची क्षमता नसते.

शरीरातील प्रत्येक पेशी अमायनो अॅसिड, फॅटी अॅसिडपासून बनत असते. त्यामुळे जेव्हा शुगर तुमच्या शरीरात जाते तेव्हा ती वापरली जाणं ही आवश्यक असतं. जे लोक खूप वर्कआउट करतात त्यांचा वापर होतो. पण जे तेवढी हालचाल करत नाहीत त्यांची साखर शरीरात साठून राहते आणि त्याचे फॅट स्टोअर होतात.

Weight Loss Diet
Weight Loss Dietesakal

काय खायला हवे, काय नको हे माहित असूनही आपण ते बदल नीट करत नाहीत म्हणून आपल्याला अपेक्षित परिणामही दिसत नाहीत. ज्यामुळे हार्मोन्स संतुलन, स्नायू बळकटी, पेशी, शरीर सक्षम होईल ते अन्न खावे.

अकतर्फी व्यायाम, किंवा कुठेही ऐकून अर्धवट डाएट किंवा कॅलरी काउंटींग करून वजन कमी होणार नाही. त्यासोबत फॅमिली हिस्टरी, कुठलं अन्न पचतं या सगळ्याचा विचार करून डाएट स्वीकारायला हवं.

Weight Loss Diet
Weight Loss Dietesakal

आरोग्य आणि वजनाचं गणित

आरोग्य आणि वजनाचं गणित समजणं फार आवश्यक असतं. आणि ते सोपंही आहे. वजन, पोटाचा घेर, शारीरिक, मानसिक शक्ती नियंत्रीत ठेवण्यासाठी आधी आहाराविषयीचे गैरसमज दूर होणे आवश्यक आहे.

आपल्याला काय आवश्यक आहे हे तज्ज्ञांच्या सल्ल्याने समजून घेत स्वतंत्र असा डाएट प्लॅन, व्यायाम नियमित केल्याने त्याचा शरीरावर योग्य परिणाम दिसतो. नुसतं वजन कमी करणे हा उद्देश नसून त्यातून चेहऱ्यावरील तेज आणि शरीरातील शक्ती कमी होऊ नये याचीही काळजी घेणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.