Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? अशनीर ग्रोवरनेही 'या' दोन गोष्टी फॉलो करत कमी केले 10 किलो वजन

तुम्हालाही वजन कमी करायचंय का? मग नियमित फॉलो 'करा या टीप्स
Weight Loss Tips
Weight Loss Tipsesakal
Updated on

Fitness Tips: बिजनेस रिअॅलिटी टीव्ही शो 'शार्क टँक इंडिया' हा प्रसिद्ध शो अनेकांचा आवडता आहे. या शोमध्ये अनेक तरुणांना त्यांच्या कौशल्य आणि कल्पनांच्या आधारावर फंड मिळालेत. त्याच्या मदतीने अनेक तरुणांनी त्यांचा यशस्वी बिजनेस सुरू केला. या शोमधील जजेसमध्ये सर्विधिक प्रसिद्ध असणारे अशनीर ग्रोवर आहेत. स्मार्ट आणि फिट दिसणाऱ्या अशीनरचं फिटनेस आणि वजन कमी करण्याचं सिक्रेट तुम्हाला माहिती आहे काय?

भारतपे चे को फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर अशनीर ग्रोवर सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. त्यांनी अलीकडेच त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. ज्यानंतर ते चर्चेत आलेत. त्यांनी फोटो शेअर करत सांगितले की कसे त्यांनी १० किलो वजन कमी केलंय ते. चला तर जाणून घेऊया त्यांचं फिटनेस सिक्रेट.

अशनीर ग्रोवर यांनी असे कमी केले वजन

अशनीर यांनी जे फोटो शेअर केले आहेत ते ब्लॅक टीशर्ट आणि जॉगर्समध्ये आहेत. त्यांच्या रिसेंट फोटोमध्ये ते फार स्लिम दिसताय. शिस्त आणि जिद्दीच्या बळावर दहा किलो वजन कमी केलंय असे त्यांचे म्हणणे आहे. हेच कॅप्शन त्यांनी त्यांच्या पोस्टला दिलंय. (Health)

Weight Loss Tips
Morning Health Care Tips: सगळे आजार पळतील दूर; फक्त सकाळी उठून करा हा उपाय

ग्रोवर यांनी सांगितले काही महत्वाचे सल्ले

  • फिटनेससाठी तुम्हाला नियम बनवावा लागेल. रोज कसे करून वेळ काढत एक तास व्यायाम करायचाच आहे. असा नियम बनवा.

  • तुम्ही आज एक तास व्यायाम केला म्हणून पुढले दोन दिवस व्यायाम करणार नाही असे चालणार नाही. शिस्त ही नियमित असावी.

  • काही लोक वजन कमी होताच एक्जरसाइज करणं सोडून देतात.

  • मी नियमितता कधीच सोडली नाही त्यामुळे आज माझी फिटनेस तुमच्यापुढे आहे.

Weight Loss Tips
Health : मधुमेहींनो बिनधास्त खा ही फळे, नाही वाढणार शुगर

वजन कमी करण्यासाठी सोपे उपाय

डाएट - कॅलरी मेंटेन करण्यासाठी नियंत्रणात खा

फिजीकल अॅक्टिविटी - एक्स्ट्रा कॅलरी बर्न करण्यासाठी भरपूर एक्जसाइज करा.

विटॅमिन आणि मिनरलयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश - अशा पदार्थांनी बॉडीच्या रिकव्हरीमध्ये मदत होईल. जसे की फळे, भाज्या, होल ग्रेन इत्यादी.

पूर्ण झोप - झोप पूर्ण झाल्यास स्ट्रेस हॉर्मोन कार्टिसोल कमी होतं. त्यामुळे ७ ते ८ तास झोप आवश्यक आहे.

नियमितता - वजन कमी करण्यासाठी तुम्ही करत असलेल्या सर्व उपायांमध्ये सातत्य असायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()