Weight Loss : वेट लॉस जर्नीमध्ये तुमच्या या 5 सवयी अडथळे निर्माण करतील, तेव्हा आजच बदला

तुमच्या सवयींमध्ये थोडासा बदल करून तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासासाठी स्वतःला तयार करू शकता. आज आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया
Weight Loss
Weight Lossesakal
Updated on

Weight Loss : धावपळीच्या जीवनात अनेकांना स्वत:कडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे अनेकांचे वजन वाढत चालले आहे. मात्र तुम्हाला वेट लॉस जर्नीमध्ये तुमच्या काही सवयींनी अडथळे येऊ शकतात. पण योग्य सवयींनी तुम्ही वजन कमी करण्याचा प्रवास सोपा करू शकता. वजन कमी करायचे म्हणजे फार मेहनत घ्यायची असे काही नसते. तुमच्या सवयींमध्ये थोडासा बदल करून तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासासाठी स्वतःला तयार करू शकता. आज आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

व्यायामासाठी शरीराला ऊर्जेची गरज असते आणि शरीराला प्रोटीनपासून ऊर्जा मिळते. मात्र तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तुम्हाला व्यायाम करताना अडचणी येतील. तुमचे शरीर लवकरच थकून जाईल. काही इतर सवयी आहेत ज्या तुम्ही वजन कमी करण्याचा प्रवास सुरू करण्यापूर्वी बदलल्या पाहिजेत. चला तर जाणून घेऊया अनेकांना असलेल्या या ५ चुकीच्या सवयींबद्दल.

१) नाश्ता न करणे

नाश्ता फक्त मील नाही तर आपल्या डाएटचा महत्वाचा भाग आहे. जे लोक वजन कमी करण्याचा प्लान करत आहेत त्यांच्यासाठी सकाळचा नाश्ता फार महत्वाचा आहे. नाश्ता केल्याने शरीराला एनर्जी मिळते. सकाळचा नाश्ता केल्याने खाण्याची क्रेवींग कमी होते. तुमच्या नाश्त्यात प्रोटीन रिच फूड अॅड करा.

२) गरजेपेक्षा जास्त हेल्दी गोष्टी खाल्ल्यास

सकस अन्न आरोग्यासाठी चांगले असते. पण गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने वजन कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढू लागते. मात्र, अन्नाचे प्रमाण तुमचे वजन वाढणार की कमी होणार ते ठरवते. उदाहरणार्थ- ओट्ससोबत दूध पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पण फुल फॅट दूध वापरल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढते. वजन कमी करण्यासाठी, प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि सर्व पोषक तत्वांचे योग्य संतुलन आवश्यक आहे. हे संतुलन तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल

३) स्वत:ला उपाशी ठेवणे

वजन कमी करण्याच्या नादात लोक स्वत:ला उपाशी ठेवतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाटी तासंतास काहीही खात नाहीत. मात्र रोज जेवणावर नियंत्रण नसलेली लोकं ही सवय फार काळ जपू शकत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा ही सवय मोडली जाते, तेव्हा व्यक्ती सामान्यपेक्षा जास्त खातो. त्यामुळे तासंतास उपाशी राहाण्याची सवय टाळा. अशा प्रकारे वजन कमी करता येत नाही. आवडेल ते खा पण एका मर्यादेपेक्षा जास्त खाऊ नका. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीचे नियोजन करू शकाल.

Weight Loss
Weigh Loss Breakfast : वजन कमी करण्यासाठी झटपट बनवा सोया पोहे

४) हेल्दी फॅट्सचे सेवन न करणे

वजन कमी करण्यासाठी शरीराला हेल्दी फॅटची आवश्यकता असते. मात्र वजन कमी करण्याचा प्लान करताच. आम्ही तुम्हाला सांगतो की हेल्दी फॅट्सच्या मदतीने मेटाबॉलिज्म वाढते. चयापचय वाढल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तुमच्या आहारात खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, बदाम यांचा समावेश करा. वजन कमी करण्यासाठी ट्रान्स फॅटचे सेवन करू नये. जंक फूडमध्ये ट्रान्स फॅट आढळून येते, जे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढवण्याचे काम करते. (Lifestyle)

Weight Loss
Weight Loss Activities : वजन कमी करण्यात जीमपेक्षा या Indoor Activity करतील जास्त मदत, कशा करायच्या ते पहा!

५) अल्कोहोलचे सेवन करणे

वजन कमी करायचे असेल तर दारूचे सेवन कमी करा. अल्कोहोलचे सेवन केल्याने भूक वाढते. वाढत्या भूकमुळे, आपण आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खाऊ लागतो. यामुळे वजन वाढते. अल्कोहोल व्यतिरिक्त, धूम्रपान देखील वजन कमी करण्याच्या प्रवासात अडथळा आणू शकते. धूम्रपानामुळे झोपेचे चक्र, पचनसंस्था, चयापचय यावर वाईट परिणाम होतो आणि तुमच्या वेट लॉस जर्नीत अनेक अडथळे येतील. त्यामुळे वेट लॉस जर्नी सुरू करण्यापूर्वी स्वतःला मादक पदार्थांपासून दूर ठेवा. (Weight Loss)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.