Weight Loss : वजन वाढण्याच्या भीतीने भात खाणे बंद केलंय? मग बिनधास्त लाल भात खा

हा एक तांदळाचाच प्रकार आहे. हा चविला खूप जास्त टेस्टी असतो.
Weight Loss
Weight Losssakal
Updated on

Weight Loss : चुकीच्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना वजन वाढीच्या समस्या येतात. वजन वाढल्यावर वजन कसं कमी करावं? किंवा वजन वाढू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, हे अनेकांना कळत नाही. त्यासाठी आपण अनेक उपाय ट्राय करण्याचा प्रयत्न करतो पण अनेकदा त्याचा काहीही फायदा होत नाही.

अनेकजण वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी भात सुद्धा खाणे टाळतात. पण तुम्हाला माहिती आहे का लाल तांदळाचा भात खाल्याने मात्र वजन वाढत नाही तर उलट कमी होतं. कारण लाल तांदूळ खूप हेल्दी असतो. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. (Weight Loss news if you avoiding rice to reduce weight then eat red rice)

लाल तांदूळ हा खूप हेल्दी आणि फॅट फ्री असतो. हा एक तांदळाचाच प्रकार आहे. हा चविला खूप जास्त टेस्टी असतो. आज आपण लाल तांदूळ खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

१. लाल तांदूळमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. जर तुम्ही लाल तांदूळ खाल्ला तर तुम्हाला रक्तातील शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी फायबर महत्त्वाचे आहे.

२. अँटीऑक्सिडंटचे प्रमाणही यामध्ये खूप जास्त असते ज्यामुळे तुम्ही मधुमेहसारख्या आजारांपासून दूर राहू शकता.

३. लाल तांदूळमध्ये व्हिटामिन्सचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे शरीरी आरोग्यदायी राहण्यास मदत होते.

Weight Loss
Weight Loss केल्यानंतर दिसणारी ही लक्षणे आहेत निरोगीपणाचे संकेत

४. हा भात कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी करण्यास मदत करतो.

५. याशिवाय ज्यांचे हाडे किंवा स्नायू दुखतात त्यांच्यासाठी लाल भात खूप फायदेशीर ठरतो.

६. ज्या लोकांना गव्हाची एलर्जी आहे त्या लोकांनी हा भात आवर्जून खावा, कारण हा भात ग्लुटेन फ्री आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()