Weight Loss Tips : तिखट खा अन् बिनधास्त वजन कमी करा

खरंच तिखट आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? चल तर जाणून घेऊया.
Weight Loss Tips
Weight Loss Tipssakal
Updated on

काही लोकांना तिखट खाण्याची सवय असते तर काही लोकांनी खूप कमी तिखट खाण्याची सवय असते. काही लोकांना तर गोड प्रचंड आवडतं. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार खात असतात.

काही लोकांना गोड कमी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात तर काही लोकांना अति तिखट न खाण्याचा. साधारण लोकांना अतितिखट खाण्याची सवय असेल तर त्या सवयीला आवर घालण्यास सांगितले जाते.

गोड पदार्थामुळे शुगर वाढणे किंवा वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.पण गोड खाण्यापेक्षा तिखट खाणं हे आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर अनेकांना वाटतं. खरंच तिखट आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? चल तर जाणून घेऊया. (Weight Loss Tips eat spicy food is good for health read story)

  • तिखट आणि मसालेदार पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचा दावा अनेक संशोधकांनी केलाय. यात कॅप्सिसिनचा समावेश असतो ज्यामुळे तिखट पदार्थांमध्ये टेस्टी वाटतात.

  • तिखट खाल्ल्यामुळे वजनवाढ आटोक्यात राहते, पचनक्रिया सुधारते आणि शुगर कंट्रोलमध्ये राहते. एवढंच काय तर तिखटामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

  • तिखट खाल्यामुळे  तुमच्या शरीरात स्ट्रेस रिलिज करणारे हॉर्मोन्स वाढतात. आणि ताण तणाव कमी होतो.

Weight Loss Tips
Health Tips: पालकसोबत ‘हे’ पदार्थ खाल्याने आरोग्यावर होऊ शकतात दुष्परिणाम...
  • ‘कॅप्सिकीन’ हा मिरचीमधला महत्त्वाचा घटक असून हा चांगल्या प्रमाणात वजनवाढ रोखण्यास मदत करतो.

  • नेहमी लो कॅलरी खाने पसंत करत असाल तर मिरची एक चांगले ऑप्शन आहे. हिरव्या मिरचीमध्ये कॅलरी नसते.

  • जर तुम्ही डायटींग करत असाल तर मिरची लठ्ठपणा कमी करण्यासाठी लाभदायक आहे.

  • लाल तिखटामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, प्रोए व्हिटॅमिन आणि भरपूर अँटीऑक्सिडंट घटक असतात ज्यामुळे शरीरात प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Weight Loss Tips
Healthy Lifestyle: ब्रेकफास्टमध्ये करा 'हे' पाच बदल; पोट दिसेल एकदम फ्लॅट
  • मात्र अति प्रमाणात तिखट खाणेही आरोग्यासाठी उत्तम नाही. यामुळे तिखट खाताना योग्य प्रमाणात तिखट खावे.

  • ज्या लोकांना आधीच आतड्याच्या समस्या, पित्ताचा त्रास, पोटाचे विकार, अॅसिडिटी असेल त्यांनी आहारात तिखटाचे  प्रमाण कमी करावे. 

  • गरोदर महिला, स्तनपान देणाऱ्या माता, लहान मुले आणि वृद्ध मंडळींनी आहारात तिखट पदार्थ खाऊ नयेत.

  • अल्सरच्या रुग्णांनी सुद्धा तिखट खाऊ नये, यामुळे अल्सर वाढण्याचीही शक्यता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.