Fat Loss Tips कितीही डाएट केलं तरी वजन कमी होत नाहीय? कारण जाणण्यासाठी करा या हार्मोन्स टेस्ट

डाएट व एक्सरसाइज करूनही शरीराचे वजन कमी होत नसेल तर आपण हार्मोन्सशी संबंधित काही टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती…
Fat Loss Tips
Fat Loss TipsSakal
Updated on

Fat Loss Tips लठ्ठपणाच्या समस्येमुळे तुम्ही देखील त्रस्त आहात का?  व्यायाम आणि योग्य डाएट प्लान फॉलो करूनही वजन कमी होत नाहीय, अशी तुमची तक्रार आहे का? खूप मेहनत घेऊनही पोटावरील वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होत नसल्याने बहुतांश लोकांची प्रचंड चिडचिडही होते. पण चिडचिड करण्याऐवजी कारणे शोधून यावर ठोस उपाययोजना करा.   

कदाचित वजन कमी न होण्यामागील कारण वर्कआऊट किंवा डाएट नसून तुमच्या शरीरातील हार्मोन्सही असू शकतात. होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. शरीराचे वजन कमी करण्यामध्ये हार्मोन्स अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. 

Fat Loss Tips
Detox Drink : रात्रभर पाण्यात भिजवलेले हे पदार्थ शरीर करतील डिटॉक्स, Weigh Loss साठी जालीम उपाय!

योगगुरू शिवानी बाजवा यांनी वेटलॉसशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्येच त्यांनी हार्मोन्स टेस्टबद्दलची माहिती दिली आहे. तर मग वेळ वाया न घालवता कोणकोणत्या वैद्यकीय तपासण्या करून घेणे गरजेचे आहे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

Fat Loss Tips
Mulberry Fruit Health Benefits : फॅटी लिव्हर, weigh loss सगळ्यावर गुणकारी आहे हे छोट फळ;एकदा खाऊन तर बघा!

इन्सुलिन (Insulin)

इन्सुलिन हार्मोन असंतुलित झाल्यास शरीराचे वजन कमी होण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. शरीरात या हार्मोनची पातळी वाढल्यास वजन वाढीची समस्या उद्भवते. त्यामुळे इन्सुलिन आणि ग्लुकोजची टेस्ट नक्की करून घ्या. 

Fat Loss Tips
Weigh Loss Breakfast : वजन कमी करण्यासाठी झटपट बनवा सोया पोहे

इस्ट्रोजेन (Estrogen)

इस्ट्रोजेन हे सेक्स हार्मोन असून ते प्रजनन प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी असंतुलित झाल्यास शरीराचे वजन, मासिक पाळी आणि मूडशी संबंधित समस्या उद्भवतात. शरीरात या हार्मोनची पातळी वाढल्यास मांड्या तसंच कमरेच्या भागामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते.  

कोर्टिसोल (Cortisol)

शरीराचे वजन नियंत्रणात आणायचे असेल तर तिसरी आणि महत्त्वपूर्ण चाचणी म्हणजे कोर्टिसोल टेस्ट. कोर्टिसोल हे स्ट्रेस हार्मोन आहे आणि यामुळे पोटावरील चरबी वाढू लागते. थकवा आणि अतिरिक्त ताणतणाव निर्माण झाल्यास शरीरामध्ये कोर्टिसोल हार्मोनचा स्त्राव होतो. शरीरातील कोर्टिसोल हार्मोनची पातळी संतुलित झाल्यास शरीराचे वजन नियंत्रण राहण्यास नक्कीच मदत मिळू शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.