Weight Loss Tips जिममध्ये न जाताही वाढलेले वजन असे करा झटपट कमी

जिममध्ये जाण्याचा कंटाळा येतो का? पण वजन देखील कमी करायचंय? तर या पद्धतीने शरीराचे वजन करा कमी
Weight Loss Tips
Weight Loss TipsSakal
Updated on

Health Care Tips : ‘काश यार व्यायाम वगैरे काहीही न करता शरीराचे वाढलेलं वजन कमी झालं तर…’ हे वाक्य आपण बहुतांश जणांकडून ऐकले असेलच. पण राव,असे काही प्रत्यक्षात घडणं मुळीच शक्य नाहीय, हे तुम्हाला माहिती आहेच. 

शरीराचे वजन कमी करायचे असेल तर डाएट आणि वर्कआऊट रूटीन फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. नियमित व्यायाम केल्यास संपूर्ण शरीरास अगणित लाभ मिळतात. यामुळे शरीराचे धोकादायक आजारांपासून संरक्षण होते तसंच शरीराची रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते.

Weight Loss Tips
Detox Drink : रात्रभर पाण्यात भिजवलेले हे पदार्थ शरीर करतील डिटॉक्स, Weigh Loss साठी जालीम उपाय!

पण काहींना जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा प्रचंड कंटाळा येतो. तर यास पर्याय म्हणून आपण अन्य व्यायाम प्रकारांची मदत घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती…

Weight Loss Tips
Weight Loss Tips चुकीच्या पद्धतीने शरीराचे वजन कमी केल्यास होऊ शकतात हे दुष्परिणाम

पोहणे

पोहण्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पोहाताना संपूर्ण शरीराची हालचाल होत असल्याने वाढलेले वजन कमी होण्यास मदत मिळते.

Weight Loss Tips
Sadhguru Weight Loss Tips : ना डाएट ना एक्सरसाइज, सद्गुरु हा ब्रेकफास्ट खाऊन वजन ठेवतात नियंत्रणात

डान्स

बऱ्याच जणांना नृत्य करण्याची आवड असते. योग्य पद्धतीने डान्स करण्याची आवड जोपासल्यास शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळू शकते. वजन कमी करण्यासाठी आपण झुम्बा, हिपहॉप यासारख्या डान्स प्रकाराचा सराव करू शकता.

चालणे

अगदी साधा आणि सोपा व्यायाम म्हणजे चालणे. यामुळे केवळ शरीरालाच नव्हे तर मानसिक आरोग्यासही लाभ मिळतात. नियमित चालण्याचा व्यायाम केल्यास शरीराचे स्नायू मजबूत होतील व वजन कमी होण्यासही मदत मिळेल.

दोरीच्या उड्या

लहानपणी प्रत्येकानेच दोरीच्या उड्या हा खेळ नक्कीच खेळला असणार, हो ना? या प्रकाराचा आपल्या वर्कआऊट रूटीनमध्ये समावेश केल्यास शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळेल, शरीराचे स्नायू मजबूत होतील शिवाय श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत येणारे अडथळे देखील दूर होतील.

Note :

एखादी शारीरिक दुखापत असल्यास किंवा काही समस्या असल्यास या व्यायाम प्रकारांचा सराव करण्यापूर्वी तज्ज्ञमंडळींचा सल्ला नक्की घ्यावा. अन्यथा शारीरिक समस्या वाढण्याची शक्यता असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()