Weight Loss Diet Plan : वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही, पोटभर खाऊन करा वेटलॉस

वजन कमी करायचे म्हणजे पहिले तर जेवण कमी करा असा सल्ला दिला जातो. पण आता हा गैरसमज दूर होणार.
Weight Loss Diet Plan
Weight Loss Diet Plan esakal
Updated on

Veg Diet Plans To Lose Weight In Marathi :

वजन कमी करायचे म्हणजे पहिले तर जेवण कमी करा असा सल्ला दिला जातो. पण आता हा गैरसमज दूर होणार. कारण वजन कमी करण्यासाठी आता तुम्हाला अर्धपोटी किंवा उपाशी राहण्याची गरज नाही. पोटभर खाऊनही वजन सहज कमी करणे शक्य होणार आहे.

वेगात वजन कमी करण्यासाठी आम्ही खास डाएट प्लॅन्स घेऊन आलो आहोत. ज्यामुळे पोटही पुर्ण भरेल, पोषणही पुर्ण मिळेल अन् वजनही कमी करण्यास मदत होईल.

Weight Loss Diet Plan
Weight Loss Diet Plan esakal

बऱ्याच लोकांना केवळ डाएटींग करावं लागेल म्हणजे कमी खाणे जमत नाही म्हणून वजन कमी करणे फार कठीण वाटते. पण आहारतज्ज्ञ सांगतात की, याची काही गरज नाही. शाकाहारी आहारामुळे वजन कमी करणे फार सोपे होते.

आज आपण असेच दोन डाएट प्लॅन जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करणे शक्य होऊ शकेल. जाणून घेऊया.

Weight Loss Diet Plan
Weight Loss: वजन कमी करण्यासाठी तुम्हीही लिंबू आणि गरम पाणी पित असाल तर थांबा... जाणून घ्या आधी हे सत्य!
Weight Loss Diet Plan
Weight Loss Diet Plan esakal

डाएट प्लॅन १

  • दिवसाची सुरुवात एक ग्लास जीऱ्याच्या पाण्याने करा.

  • नाश्त्यात स्टीम्ड स्प्राउट्स चाट खावे. ज्यात काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबू आणि सेंधव मीठाचा समावेश असावा.

  • नाश्ता आणि लंचच्या दरम्यान एक कप ग्रीन टी आणि ५ भीजवलेले बदाम खावे.

  • दुपारच्या जेवणात २ चपात्या, १ वाटी बिन्सची भाजी, १ वाटी कोशिंबीर, रायता आणि सलाद खावे.

  • रात्रीच्या जेवणाआधी १ चमचा जवस आणि १ वाटी सूप प्यावे.

  • रात्रीच्या जेवणात १-२ चपाती, १ वाटी दूधी भोपळ्याची भाजी आणि सलाद खावे.

Weight Loss Diet Plan
Don'ts In Weight Loss Journey : वेटलॉस जर्नीत या 5 चुका टाळा, ऋजुता दिवेकरने दिला सावधगिरीचा इशारा
Weight Loss Diet Plan
Weight Loss Diet Plan esakal

डाएट प्लॅन २

  • सकाळी उठल्यावर उपाशीपोटी १ ग्लास धण्याचे पाणी प्यावे.

  • नाश्त्यात १ चमचा पुदिना चटणीसोबत बेसन आणि ओट्सपासून बनवलेले थालिपीठ खावे.

  • नाश्ता आणि दुपारच्या जेवणादरम्यान १ चमचा चिया सीड्स सोबत लिंबू पाणी प्यावे. यासाठी चिया सीड्स आधीच लिंबाच्या पाण्यात भिजवून ठेवावे.

  • दुपारच्या जेवणात १ वाटी भात, १ वाटी बीन्सची भाजी, सलाद खावे.

  • संध्याकाळी १ वाटी डाळींबाचे दाणे खावे.

  • रात्रीच्या जेवणाआधी १ कप लिंबू पाणी प्या.

  • जेवणात १ चपाती, शिमला मिरची आणि मशरूमची भाजी, सलाद खावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.