Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी दिवसातून पाच वेळा जेवा!

पोटभर जेवल्याने वजन अधिकच वाढायला सुरूवात होते
Weight Loss
Weight LossEsakal
Updated on

Eat This Mini Meal For Weight Loss : वजन कमी करणे म्हणजे स्वतःला खाण्यापासून थांबवणे. त्यासाठी डायट करणे, उपवास करणे होय. अनेक लोक डायट प्लॅन फॉलो करून वजन कमी करतात. डायटशनिस्टही जसे सांगतील तसे ऐकून व्यायामही करतात. तरीही काहीवेळा वजन कमी व्हायला वेळ लागतो. काही लोक तर डायटसाठी एकवेळ जेवतात. नाश्ता चहा बंद करतात. यामूळे त्यांना अशक्तपणा जाणवायला लागतो.

सध्याच्या भारतीय पद्धतीनूसार सकाळी नाश्ता, दुपारी आणि रात्री जेवण घेतले जाते. या पद्धतीची सवय झाल्याने डायट करणे अनेकांच्या जीवावर येते. पण, पोटभर जेवल्याने वजन अधिकच वाढायला सुरूवात होते. त्यामूळे न्युट्रीशनिस्ट नेहमी एकदाच पोटभर खाण्याऐवजी थोडे थोडे जेवण करण्याचा सल्ला देतात.

Weight Loss
Wedding Season: नववधूंसाठी ३०० ते दीड हजारांपर्यंतच्या ९ हेअरस्टाईल

वैद्यकीय भाषेत याला मिनी मील म्हणतात. मिनी मील घेतल्याने पोट थोडावेळ भरलेले आणि थोडावेळ रिकामे राहते. यामूळे शरीरात चरबी जमा होण्यास प्रतिबंध होतो. वजन कमी करण्यासाठी किती वेळा जेवावे हे माहिती झाले आता काय खावे हे पाहुयात. 

सँडविच

भरपूर चीज असलेले सँडविच खाण्याऐवजी चीज नसलेले आरोग्यदायी सॅलेडचे सँडविच खा. यासाठी गहू किंवा मल्टीग्रेनचा ब्रेड वापरा. यासोबत खिसलेले चिकन, पनीर, लेट्युस, ब्रोकोली, टोमॅटो, काकडी सुद्धा खाऊ शकता.

Weight Loss
Health Care: केळी आणि दूध एकत्र घ्यायची सवय आहे? होतील गंभीर परिणाम

फळे

हा सर्वोत्तम मिनी मील आहे. तुम्ही ते दिवसातून अनेक वेळा घेऊ शकता. प्रत्येक दोन जेवणाच्या मध्ये तूम्ही एक फळ खाल्ल्याने तुम्हाला एकाच वेळी हायड्रेटेड राहण्यास मदत होते. यामूळे पोटही भरलेले राहते. बहुतेक फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्यातील फायबर वजन कमी करण्यास मदत करतात.

Weight Loss
Winter Health Care: हिवाळ्यात चुकूनही सॉक्स घालून झोपू नका; होऊ शकतो हा त्रास...

कडधान्ये

वजन कमी करण्यासाठी मिनी जेवणात कडधान्यांचा समावेश करा. एक वाटी मोड आलेली कडधान्यांमध्ये उच्च प्रतीचे फायबर आणि आवश्यक पोषक घटक असतात. जे चरबी घटवण्यास मदत करतात. त्यावर चिमूटभर गुलाबी मीठ आणि काळी मिरी भिजवलेले काजू आणि मिक्स कडधान्येही खाऊ शकता.

Weight Loss
Tawa Cleaning : काळा तवा करा चकचकीत! ट्राय करा हे तीन घरगुती उपाय

टोस्ट आणि ऑम्लेट

जेव्हा तुम्हाला झटपट काही बनवून खायचे असेल तेव्हा कुरकुरीत टोस्ट बेस्ट आहे. मिनी जेवण म्हणून तुम्ही ऑम्लेटसोबत अॅव्होकॅडो फळ टोस्ट किंवा ऑमलेटसोबत घेऊ शकता. तुम्ही ते दिवसाच्या कोणत्याही वेळी घेऊ शकता. अंड्यातील पिवळ बलक काढून टाका.

दही. फळे, शेंगदाणे आणि बिया

वजन कमी करण्यासाठी ग्रीक दही बेस्ट आहे. कारण सामान्य दहीपेक्षा अधिक प्रोटीन्स आणि फायबर या ग्रीक दह्यामध्ये असतात. चवीला हे थोडे आंबट असते. दह्यासोबत पौष्टिक मिनी स्नॅक बनवण्यासाठी एका भांड्यात काही बारीक केलेली फळे, मिक्स बिया आणि काजू घाला. दिवसातील कोणत्याही वेळेला हे तूम्ही खाऊ शकता.

Weight Loss
Shilpa Shetty: तुम्हाला माहितीय? झीरो फिगर शिल्पा शेट्टी सतत खात असते.. तरीही ती फिट कशी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.