Weight Loss Tips : मसाल्यांच्या सेवनानेही वजन कमी होते का?

या उपायासोबत व्यायामही केल्यास आठवड्यातून किमान दोन ते तीन किलो वजन कमी करता येईल
Weight loss tips
Weight loss tips Esakal
Updated on

लग्नसराई सुरू झालीय त्यामूळे पाहुणेमंडळींच्या लग्नात सहभागी व्हावेच लागते. पण, सुटलेल्या पोटामूळे काही वेगळी स्टाइल करण्याचा मुड होत नाही, अशी तक्रार आजकाल अनेकजण करतात. अशावेळी लगेच वजन कमी होत नाही. त्यामूळे एका आठवड्यात जर तूम्हाला वजन कमी करायचे असेल. तर एक खास काढा आज आम्ही तूम्हाला सांगणार आहोत.

मसाल्यांचे सेवन केल्याने वजन वाढते. पित्ताचा त्रास होतो. हे ऐकले आहे. पण, तेच तूमच्या किचनमधले मसाले आता तूम्हाला वजन कमी करायाला मदत करणार आहेत. वाढलेली पोटाची ढेरी एका आठवड्यात कमी होईल. या देशी उपायासोबत व्यायामही केल्यास आठवड्यातून किमान दोन ते तीन किलो वजन कमी करता येईल.  हा प्रयोग तूम्हाला नेहमीच्या लाइफस्टाइलमध्ये समाविष्ट करावी लागेल. तरच त्याचे परमनंट रिझल्ट तूम्हाला मिळतील.

Weight loss tips
Supreme Court : मुस्लिम मुलींच्या लग्नाबाबत सर्वोच्च न्यायालयानं धाडली केंद्राला नोटीस; चार आठवड्यांत मागितलं उत्तर

मसाल्यांचा काढा तूम्हाला रोज सेवन करायाचा आहे. संपूर्ण शरीरातील आणि पोटातील चरबी वितळवून ती बाहेर काढते. वजन कमी करण्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. डायटसोबत वर्कआऊटही आवश्यक आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही. फक्त घराच्या स्वयंपाकघरात ठेवलेले काही मसाले तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही रेसिपी आणि हे हर्बल ड्रिंक घरी कसे बनवायचे.

मसाले जेवणाच्या चवीसाठी तर चांगले असतातच पण आरोग्यासाठीही चांगले असतात. काही मसाल्यांचा प्रभाव असा असतो की ते शरीरात जमा झालेली चरबी वितळवण्यात प्रभावी ठरतात. आपण जिरे, वेलची, बडीशेप, तमालपत्र आणि ओव्यापासून बनवणार आहोत.या मसाल्यांमध्ये तुमच्या पोटाची चरबी वितळवण्याची ताकद आहे. हे थंडीत प्यायल्याने शरीराला उष्णताही मिळते आणि सांधेदूखीपासून आरामही मिळतो.

Weight loss tips
Yoga Trends In 2022 : निरोगी राहण्यासाठी 2022 मध्ये होता 'या' योगासनांचा ट्रेंड

विशेष बाब म्हणजे ही नैसर्गिक हर्बल पेये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-एलर्जिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. हे सर्व मसाले १ चमचाभर रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी चांगले उकळून घ्या. तमालपत्र काढून घेऊन इतर पदार्थ चावून खा. हा काढा गरम प्या आणि एक एक घोट पोटात घ्या. असे केल्यानेच या उपायाचा जास्त प्रभाव पडेल.

Weight loss tips
Shrikant Thackeray Death Anniversary : जेव्हा राग भैरवचा आलाप ऐकून बेशूद्ध पडलेल्या श्रीकांत ठाकरेंना जाग आली!

काढ्यासोबतच कसे ठेवाल डायट

नाश्ता सकाळी 9 वाजता

रोज सकाळी उपाशी पोटी हा काढा प्या. त्यानंतर सुमारे 1 ते 2 तास काहीही खाऊ नका. यानंतर नाश्त्यात दोन अंड्यांचा पांढरा भाग हिरव्या भाज्या आणि लेट्यूसच्या पानांसह खा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्प्राउट्स, चिल्ला किंवा ओट्स देखील घेऊ शकता.

दुपारचे जेवण

दुपारच्या जेवणासाठी ओट्स पिठाच्या किंवा मल्टीग्रेन पिठाच्या दोन चपाती  खा. त्यासोबत एक मोठी वाटी डाळ, एक मोठी प्लेट कोशिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या घ्या. त्यासोबत दही किंवा ताक प्या.

सायंकाळचा नाश्ता

दुपारच्या जेवणानंतर सुमारे 4 तासांनी संध्याकाळचा नाश्ता करा. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये तुम्ही काही काजू, सूर्यफूल किंवा भोपळ्याच्या बिया रोस्ट करून खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पॉपकॉर्नही खाऊ शकता.

Weight loss tips
Physical Relation Ban: या देशात लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्यास बंदी; पर्यटक भडकले कारण...

रात्रीचे जेवण रात्री 7 दरम्यानच करा

रात्रीचे जेवण संध्याकाळी सात वाजेपर्यंत करा. संध्याकाळी सात वाजता एक मोठी वाटी सॅलड आणि ग्रील्ड चिकन किंवा पनीरसोबत दोन चपाती खा. झोपताना गरम दूध प्या. या आहारामुळे आठवड्यातून किमान दोन ते तीन किलो वजन कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.