Health Care News : तुम्हाला माहीत आहे का सकाळी रिकाम्या पोटी चिमूटभर हळद खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी, आपल्याला कोणताही किंवा ट्रेंड फॉलो करण्याची गरज नाही, तर केवळ घरी ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकतात.
turmeric
turmericsakal
Updated on

तुमच्या आहारात काही आरोग्यदायी बदल करून तुम्ही निरोगी राहू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? तसेच तुम्ही योग्य वेळी योग्य पदार्थ खाल्ले तर अनेक आजार टाळता येतात? निरोगी राहण्यासाठी, आपल्याला कोणताही ट्रेंड फॉलो करण्याची गरज नाही, तर केवळ घरी ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकतात.

हळद जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात वापरली जाते. यामुळे जेवणाची चव आणि रंग तर सुधारतोच पण आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे. दररोज रिकाम्या पोटी एक चिमूटभर हळद खाल्ल्याने आरोग्यासाठी असंख्य फायदे मिळू शकतात. याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

दररोज रिकाम्या पोटी चिमूटभर हळद खाण्याचे फायदे

रोज सकाळी रिकाम्या पोटी चिमूटभर हळद खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन जळजळ कमी करते.

हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात.

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. हे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि अनेक प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करते.

रिकाम्या पोटी चिमूटभर हळद खाणे ओरल हेल्थसाठीही फायदेशीर असते.

यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात आणि अनेक प्रकारच्या अ‍ॅलर्जीपासून बचाव होतो.

यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

turmeric
Women’s Health: शारिरीक तंदूरूस्तीसाठी महिलांनी तिशीनंतर 'या' सुपरफूड्सचा आहारात करावा समावेश

रिकाम्या पोटी हळदीचे सेवन कसे करावे?

रोज सकाळी उठल्यावर चिमूटभर हळद खा.

तुम्हाला हे रिकाम्या पोटी करावे लागेल.

यानंतर मलासनात बसून कोमट पाणी प्यावे.

पाणी हळू हळू प्या.

हे प्यायल्यानंतर काही वेळ काहीही खाऊ नका.

Related Stories

No stories found.