Dead Butt Syndrome : 'डेड बट सिंड्रोम' झाल्यानंतर जागे होऊ नका, वेळीच ही सवय बदला,नाहीतर...

What Is Dead Butt Syndrome : 'डेड बट सिंड्रोम' काय आहे? जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपाय
Dead Butt Syndrome
Dead Butt Syndrome esakal
Updated on

Dead Butt Syndrome :

आजकालच्या पिढीतील लोकांनी थोड काम केलं तरी त्यांना थकायला होतं, ही मोठी समस्या बनली आहे. कारण, सर्वकाही जागेवर बसून हवं असतं, त्यामुळं शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. त्यामुळे शारीरिक व्याधींचे घरच आपले शरीर बनले आहे.

ऑफिसमध्ये काम करणारे लोक दिवसभर बसून असतात. जर कोणी घरून काम करत असेल तर तो बराच वेळ घरी बसून असतो. कोणी कामावर जात नसेल तर तो घरी फोन किंवा टीव्हीसमोर घेऊन बसलेला असतो.

पण तुम्हाला माहित आहे का, तासंतास बसून राहण्याने शरीरावर अनेक घातक परिणाम होतात. त्यापैकी एक म्हणजे डेड बट सिंड्रोम (डीबीएस) किंवा ग्लूटीअल ऍम्नेशिया होय.

Dead Butt Syndrome
Vision Syndrome: योगा क्विन शिल्पाचा हा सोपा व्यायाम दूर करेल तुमचा कंप्युटर व्हिजन सिंड्रोम

हा आजार थेट तुमच्या नितंंबांच्या स्नायूंवर परिणाम करतो. यामुळे तुमच्या शरीराची रचना आणि मुद्रा यांच्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. हा आजार कशामुळे होतो, त्याची लक्षणे, कारणे आणि उपाय याबद्दल जाणून घेऊयात.

हा आजार कधी होतो? 

जेव्हा शरीरातील ग्लूटील स्नायू कमकुवत होतात, दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे किंवा हालचालींच्या अभावामुळे योग्यरित्या कार्य करत नाहीत तेव्हा हा डेड बट सिंड्रोम हा आजार उद्भवतो. हे स्नायू तुमच्या कंबरेच्या खालील भागातील हालचाली सुरळीत करण्यास महत्वाचे ठरतात.

Dead Butt Syndrome
Rumination syndrome : रुमिनेशन सिंड्रोम

स्नायूंची हालचाल मंदावते तेव्हा

जेव्हा हे स्नायू सक्रिय नसतात तेव्हा ते त्यांचे कार्य योग्यरित्या करत नाहीत.  ज्यामुळे शरीरात असंतुलन होऊ शकते. डेड बट सिंड्रोमचे मुख्य कारण म्हणजे बैठी जीवनशैली होय. दीर्घकाळ बसून राहिल्याने शरीरातील ग्लुट स्नायू कमकुवत होतात.

बैठकीची स्थिती

काही लोक काम करताना कसेही बसतात. त्यांच्या अव्यवस्थित बसण्याने शरीरावर दाब पडतो. खराब पोस्चरमध्ये बसल्याने पाठ आणि नितंबांवर दाब पडतो, ज्यामुळे ग्लूट्स आणखी कमकुवत होतात.

Dead Butt Syndrome
Computer Vision Syndrome : कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणजे नक्की काय? जाणून घ्या..

व्यायामाचा अभाव

ग्लूट्सला लक्ष्य करणारे व्यायाम न केल्याने स्नायूंचा वापर असमतोल होऊ शकतो

स्नायूंमधील असमतोल

एखादे कार्य करताना, किंवा व्यायाम करताना आपल्या ग्लूट्सऐवजी आपल्या हिप फ्लेक्सर्स आणि पाठीच्या खालच्या स्नायूंवर अधिक अवलंबून राहिल्याने असंतुलन होऊ शकते.

डेड बट सिंड्रोमची लक्षणे काय आहेत?

  • शरीराच्या खालील भागात वेदना होणं

  • नितंबामध्ये कडकपणा जाणवणे

  • नितंब सुन्न होणं

  • स्नायूंमध्ये अशक्तपणा येणं

ऑफिसमध्ये वा घरी लोक कसेही काम करत बसतात, याचा त्यांना भविष्यात त्रास उद्भवू शकतो
ऑफिसमध्ये वा घरी लोक कसेही काम करत बसतात, याचा त्यांना भविष्यात त्रास उद्भवू शकतोesakal
Dead Butt Syndrome
Dry Eye Syndrome : उन्हाळ्यात लोकांना होत आहे ड्राय आय सिंड्रोम; वेळीच ओळखा लक्षणे!

यावर काय उपाय करावे?

थोडा-थोड्यावेळाने ब्रेक घ्या

एका जागी बसून राहण्याचे काम असेल तर थोड्या-थोड्यावेळानंतर ब्रेक घ्या. ऑफीसमध्येही दर 30 मिनिटांनी ब्रेक घेऊन सतत बसून राहणे टाळा. यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. आणि आपल्या स्नायूंना निष्क्रिय होण्यापासून प्रतिबंधित करते.

व्यायाम करा

तुम्ही दररोज व्यायाम करायला हवा. विशेषत: तुमच्या ग्लुट्सला लक्ष्य करणाऱ्या व्यायामांचा समावेश करा, जसे की: ग्लूट ब्रिज, क्लॅमशेल्स, स्क्वॅट्स आणि लंग्ज, तुमचे हिप फ्लेक्सर्स स्ट्रेच करा, योग्य पोश्चर ठेवा, स्टँडिंग डेस्क वापरा.

ग्लूट ब्रिज, क्लॅमशेल्स, स्क्वॅट्स अशा व्यायामांचा सराव करा
ग्लूट ब्रिज, क्लॅमशेल्स, स्क्वॅट्स अशा व्यायामांचा सराव कराesakal
Dead Butt Syndrome
Stockholm Syndrome: काही जण अपहरणकर्त्याच्या प्रेमात का पडतात? जाणून घ्या 'स्टॉकहोम सिंड्रोम काय असतो, नाव कसे पडले

बैठकीची स्थिती

बसताना तुमचा कोर आणि ग्लूट्स सक्रिय करण्यासाठी तुमची पाठ सरळ आणि तुमचे पाय जमिनीवर सपाट ठेवून बसण्यावर लक्ष केंद्रित करा.

 

बसूनच नाही तर उभं राहूनही काम करता येईल हे पहा

आजकाल बाजारात तुम्ही उभे राहूनही काम करू शकता, असे डेस्क उपलब्ध आहेत. स्टँडिंग डेस्क किंवा ॲडजस्टेबल वर्कस्टेशन वापरण्याचा विचार करा जिथे तुम्हाला बसून आणि उभे राहूनही आरामात काम करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.