Dizziness : वारंवार चक्कर येते? मग, जाणून घ्या त्यामागची 'ही' कारणे

Dizziness : चक्कर येणे ही डोकेदुखीनंतरची सगळ्यात सामान्य तक्रार आहे.
Dizziness
Dizziness esakal
Updated on

Dizziness : चक्कर येणे ही डोकेदुखीनंतरची सगळ्यात सामान्य तक्रार आहे. याप्रसंगी नेमके उपचार कुठे करावेत, हे माहीत नसल्यामुळे बहुतांश रुग्णांचा अस्थिरोगतज्ज्ञ, मेंदूविकारतज्ज्ञांपासून सगळीकडे फेरफटका मारून होतो.

मात्र, चक्कर येण्यामागील ८० टक्के कारणे ही कानाशी संबंधित असतात आणि हेच जनसामान्यांना माहीत नसल्यामुळे बहुतांश रुग्णांचा घोळ होतो. त्यामुळे रुग्ण वेगवेगळ्या तज्ज्ञांकडे फिरत राहतो. सर्व तपासण्या, अगदी मेंदूचे एमआरआय करून झाल्यानंतर पेशंट कानामुळे तर चक्कर येत नाही ना, हे तपासण्यासाठी कानाच्या डॉक्टरांकडे जातो.

चक्कर येते ते लोक त्याचे वर्णन अनेक वेगवेगळ्या संवेदना म्हणून करू शकतात. जसे की, हालचाल किंवा खोली फिरल्याची खोटी भावना, डोके हलके होणे किंवा अशक्तपणा जाणवणे, तरंगणे किंवा डोक्यात जडपणाची भावना, चालणे, उभे राहणे किंवा डोके हलविल्याने या भावना वाढतात व रुग्णाची परिस्थिती जास्त बिघडू शकते. ही मळमळ इतकी अचानक व इतकी तीव्र असू शकते की, तुम्हाला खाली बसायला किंवा झोपायला लागू शकते.

Dizziness
Monsoon Health Care : आला पावसाळा, तब्येतीला सांभाळा.! संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अशी घ्या आरोग्याची काळजी

चक्कर येण्याची अनेक कारणे

कानामधून घंटीसारखा आवाज येणे, कानाला दडा बसणे, कानाची ऐकण्याची क्षमता कमी होणे अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित कानाच्या डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे. चक्कर येण्याची असंख्य कारणे आहेत. त्यामध्ये रक्तातील साखर कमी होणे, रक्तदाब कमी होणे, रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे ही कारणे तर सर्वश्रुत आहेत.

याचबरोबर सर्वाइकल स्‍पाँडिलायसिस, मेंदूचे विकार (छोट्या मेंदूचा रक्तपुरवठा कमी होणे म्हणजेच स्ट्रोक, ब्रेन ट्युमर) या सर्व कारणांचाही समावेश होतो; परंतु चक्कर येण्यामागे ८० टक्के कारणे कानाशी संबंधित आजारांमध्ये असतात आणि कानाशी संबंधित १० ते १२ प्रकारच्या आजारांमुळे चक्कर येऊ शकते म्हणजेच कानाच्या विविध आजारांचे चक्कर येणे, हे एक प्रकारचे लक्षण आहे.

२० टक्के चक्कर ही ‘बीपीपीव्ही’

यामध्ये प्रामुख्याने २० टक्के चक्कर ही ‘बीपीपीव्ही’ (सौम्य पेरिफेरल पोझिशनल व्हर्टिगो) मुळे येते. सौम्य पॅरोक्सिमल पिझिशन व्हर्टिगो या प्रकारची चक्कर ‘बीपीपीव्ही’ म्हणूनही ओळखली जाते आणि कानात ओटोलिथ नावाच्या कॅल्शिअम कणाच्या हालचालींमुळे होऊ शकते. हे कण जेव्हा स्वत:ची मूळ जागा सोडून आंतरकर्णाच्या सेमी सर्क्युलर कॅनॉलमध्ये जाऊन फिरतात, तेव्हा अशी चक्कर येते.

उपचार पद्धती कोणती?

डोके गोलाकार फिरवून उपचार : वेगवेगळ्या प्रकारचे ‘मॅन्युवर्स’ केवळ डोके हाताने वेगवेगळ्या कोनांमधून शास्त्रशुद्ध पद्धतीने फिरविण्याचा उपचार केला जातो आणि त्यामुळे हा आजार बरा होतो. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या औषधांची गरज शक्यतो भासत नाही. चक्कर येण्याच्या इतर कारणांमध्ये आंतरकर्णाचा दाह आतल्या कानाचे व्हायरल इन्फेक्शन, कानाच्या नसेचे ट्युमर आदी आजारांचा समावेश होतो.

आंतरकर्णातील ‘लॅबिरिंथ’ किंवा ‘कॉकलिया’ या भागातील विविध दोषांमुळे चक्कर येण्याचे कारण सर्वाधिक आहे. कानाच्या आजाराचे नेमके कारण शोधावे लागते आणि आजाराचे अचूक निदान झाल्यानंतर उपचार केले जातात. काही आजार व स्थितीमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते; मात्र अचूक निदानानंतर खात्रिशीर उपचार होऊ शकतात व आजार बरा होऊ शकतो.

Dizziness
Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.