Heart Health : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिल्या तासाला डॉक्टर ‘गोल्डन अवर’ म्हणतात. रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी तसेच तो बरा होण्याकरता हा एक अत्यंत महत्वाचा ठरतो. या एका तासात वेळीच आणि योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाला जीव गमवावा लागत नाही.
पहिल्या एका तासात रुग्णांवर योग्य उपचार झाले नाहीत तर, जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. त्यामुळे, लक्षणं दिसू लागताच त्वरीत रुग्णालयाकडे धाव घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
हार्ट अटॅकनंतर येतात या अडचणी
हार्ट अटॅकनंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांत अडथळा निर्माण होतो. हृदयाला रक्तपुरवठा न झाल्याने हृदयाचे स्नायू 80-90 मिनिटांनी हळूहळू डेड होण्यास सुरुवात होते. स्नायू कमकुवत होण्यास सुरुवात होते. उपचारासाठी उशीर झाला तर हृदयाचे ठोके अनियमित होतात. मात्र हे या 'गोल्डन अवर'मध्ये योग्य उपचारांनी सुरळीत करता येऊ शकतं.
हृदयविकाराची लक्षणे
छातीत जडपणा किंवा तीव्र वेदना
हात, जबडा, मान, पाठ आणि ओटीपोटात दुखणे
घाम येणे
चक्कर येणे किंवा चिंताग्रस्त होणे
दम लागणे
मळमळणे आणि खोकला येणे
श्वास घेण्यास त्रास होणे
अशक्तपणा (Health News)
गोल्डन अवरमध्ये असा करा प्रथमोपचार ?
छातीत दुखू लागल्यानंतर वेळ न करता लगेच रुग्णालयात न्यावे.
तातडीनं जवळच्या रूग्णालयातून ईसीजी काढून घ्यावा.
छातीत जळजळ होणे हे प्रत्येक वेळी अॅसिडीटीचं लक्षण नसून गंभीर आजारही असू शकतो.
जर रुग्ण बेशुद्ध पडला असेल तर ताबडतोब त्याला सपाट ठिकाणी झोपवा. नंतर त्याच्या नाकाजवळ बोटांनी किंवा कानांनी त्याचा श्वास तपासा. शिवाय नाडी देखील तपासा.
आपला डावा हात सरळ ठेवा आणि उजवा हात त्याच्यावर ठेवा आणि बोटांनी लॉक करा. यानंतर, आपले हात रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी आणा आणि आपल्या सर्व ताकदीनिशी रुग्णाची छाती दाबा अशा पद्धतीने सीपीआर द्या.
दर मिनिटाला 120 कॉम्प्रेशन्स द्याव्या लागतील, ही क्रिया रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत किंवा रुग्णवाहिका येईपर्यंत करावी लागेल.
ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे त्या व्यक्तीने अनावश्यक हालचाल करु नये. स्वतः पायी दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करु नये. जिने चढणे आणि उतरणे करु नये. स्वतः गाडी चालवू नये.
डिस्क्लेमर - डॉ. राहुल ठंकी हे इमरजंसी मेडिसिन स्पेशालिस्ट असून त्यांनी सांगितलेला हा उपाय आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.