Health Care : हिमोफोलिया हा एक प्रकारचा गंभीर आजार आहे. या आजाराचा आपल्या शरीरातील रक्तावर परिणाम होतो. ही समस्या उद्भवल्यास शरीरातील रक्त जमा होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे, काही जखम झाल्यास शरीरातून होणारा रक्तस्त्राव हा लवकर थांबत नाही.
अनियंत्रित रक्तस्त्राव होणे, हे हिमोफोलियाचे सर्वात सामान्य लक्षण आहे. हिमोफोलियाने ग्रस्त असलेल्या मुलांना दुखापत झाल्यानंतर बराच काळ रक्तस्त्राव होण्याची समस्या दिसून येते.
ही समस्या असलेल्या व्यक्तींना किंवा मुलांना हाताला पायाला जर गंभीर दुखापत झाली तर रक्तस्त्राव अजिबात थांबत नाही. ही समस्या निर्माण होण्यामागचे कारण म्हणजे, या रूग्णांमध्ये रक्त साठवण्याचे घटक नसल्यामुळे ही समस्या उद्भवते.
आपल्या शरीरामध्ये रक्तस्त्राव रोखण्यासाठी एक प्रथिने काम करते. ज्याला क्लोटिंग फॅक्टर असे म्हटले जाते. या प्रथिन्याद्वारे रक्तस्त्राव नियंत्रित करण्याचे काम केले जाते. हिमोफोलिया A आणि हिमोफोलिया B हे या हिमोफोलियाचे प्रकार आहेत.
आज आपण लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या हिमोफोलियाची लक्षणे आणि त्यामागील कारणे जाणून घेणार आहोत.
मांसपेशी आणि सांध्यांमध्ये रक्तस्त्राव होणे
अंतर्गत रक्तस्त्राव होणे
शस्त्रक्रिया केल्यानंतर दीर्घकाळापर्यंत रक्तस्त्राव होणे
नाकातून वारंवार रक्त येणे
हिरड्यांमधून सतत रक्तस्त्राव होणे
लहान मुलांमध्ये आढळून येणारा हा आजार कधीकधी औषधांचा वापर केल्यानंतर ही थांबत नाही. त्यासाठी, शस्त्रक्रिया करण्याची देखील गरज पडू शकते.
सांध्यांमध्ये रक्तस्त्रावाची समस्या वांरवार निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागू शकते.
या आजारामुळे लहान मुलांचा जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर त्यांना अतिरिक्त रक्ताची गरज भासू शकते.
हिमोफोलिया या आजारावर उपचार करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे शरीरातील मिसिंग क्लोटिंग फॅक्टर बदलणे हा आहे. जेणेकरून शरीरातील रक्तप्रवाह हा सुरळीत होऊ शकेल.
या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तींच्या आहारात व्हिटॅमीन बी 12 आणि व्हिटॅमीन बी ६ ने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.