Matthew Perry Death : मॅथ्यू पेरीच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेली केटामाइन थेरपी काय आहे? या कारणामुळे करत होता सेवन

केटामाइन थेरेपी काय आहे? जाणून घ्या
Matthew Perry Death : मॅथ्यू पेरीच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेली केटामाइन थेरपी काय आहे? या कारणामुळे करत होता सेवन
Updated on

नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीवी शो फ्रेंड्समधील चँडलरची भूमिका करणारा मॅथ्यू पेरीचे काही दिवसांपुर्वी निधन झाले होते. मॅथ्यू पेरीचा वयाच्या ५४ व्या वर्षी मृत्यू झाल्याने चाहत्यांना धक्का बसला होता.

अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृतदेह राहत्या घरी आढळला. मॅथ्यूचा मृतदेह घरातील जकुजीमधे बुडालेल्या अवस्थेत सापडल्याने त्याच्या मृत्युचं नेमकं कारण याबाबत अनेक चर्चा होत्या.

आता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूशी संबंधित वैद्यकीय अहवाल शुक्रवारी समोर आला आहे. यात मॅथ्यूच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. केटामाईनच्या ओव्हर डोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लॉस एंजेलिसच्या काउंटी वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने त्याच्या मृत्यूचे कारण बुडणे, कोरोनरी धमनी रोग आणि अपघात म्हणून नोंद केले आहे. त्याच्या मृत्यूच्या आधीच्या तपासात घटनास्थळी कोणतेही ड्रग्स आढळले नाहीत, परंतु त्याच्या घरी प्रिस्क्रिप्शन औषधे सापडली आहेत.

Matthew Perry Death : मॅथ्यू पेरीच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेली केटामाइन थेरपी काय आहे? या कारणामुळे करत होता सेवन
Health Care News: व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर काय खावे? वाचा एक्स्पर्ट काय सांगतात…

रिपोर्टनुसार, पेरीच्या रक्तातील केटामाइनची पातळी जास्त होती. केटामाइनच्या अती सेवनाने पेरीच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाचा वेग वाढला आणि तो बेशुद्ध झाला, त्यानंतर पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

केटामाइन हे वेदना आणि चक्कर येणे यांसारख्या ऑफ-लेबल संकेतांसाठी वापरण्यात येणारे ऍनेस्थेटिक औषध आहे. डिप्रेशनच्या उपचारासाठी केटामाइनचे दोन प्रकार वापरले जातात, एक रेसेमिक केटामाइन आणि दुसरे एस्केटामाइन.

केटामाइन हे इंट्राव्हेनसद्वारे दिली जाते. या दोन पद्धतींपैकी कोणती पद्धत आपल्यासाठी सर्वोत्तम आहे हे पाहिले जाते आणि नंतर तीच लागू केली जाते.

केटामाइन हे पारंपारिक एंटिडप्रेसन्ट्सपेक्षा वेगळे आहे कारण ते डिप्रेशनच्या लक्षणांमध्ये झपाट्याने घट निर्माण करते, विशेषतः आत्महत्येचा विचार येत असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. औषध दिल्यानंतर काही तासांत डिप्रेशनची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.

केटामाइन कसे काम करते?

केटामाइन कसे काम करते हे अद्याप अज्ञात आहे परंतु ते NMDA रिसेप्टर्सला लक्ष्य करते आणि न्यूरोट्रांसमीटर ग्लूटामेट वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे AMPA रिसेप्टर अपग्रेडेशन होते. ही प्रक्रिया सायनॅप्टोजेनेसिसला मदत करते आणि BDNF देखील वाढवते. BDNF, एक प्रकारचा ग्रोथ फॅक्टर आहे, ज्यामध्ये एंटिडप्रेसससारखे प्रभाव आहेत. IV केटामाइनचा मानक प्रारंभिक डोस 0.5 mg/kg आहे 40 मिनिटांत दिला जातो.

केटामाइन वापरणे धोकादायक ठरू शकते.

  • हृदयाच्या समस्या

  • धाप लागणे

  • मतिभ्रम

  • भ्रम

  • स्मरणशक्ती कमी होणे

  • एग्जाइंटी

  • डिप्रेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.