Liposuction Surgery : सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या समस्यांमध्ये लठ्ठपणाचा ही समावेश आहे.
आजकाल किशोरवयीन मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही जण निरोगी जीवनशैलीचा अवलंब करतात. परंतु, काही जण कमी वेळात वजन कमी करण्यासाठी किंवा चरबी कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेचा अवलंब करतात.