मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय? मात करण्यासाठी आधुनिक उपचारांची घ्या मदत

ब्रेस्ट कॅन्सर पूर्ण बरा झाल्यानंतर तो १० वर्षांच्या आत पुन्हा परतण्याची शक्यता ३०-६०% असते.
Metastatic Breast Cancer
Metastatic Breast Canceresakal
Updated on

जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या (स्तनाचा कर्करोग) केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. महिला आणि तरूण मुलींमध्ये हा स्तनाचा कर्करोग वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आपल्या देशातही याचे प्रमाण वाढले आहे.

या कॅन्सरचे निदान झाल्यावर आपल्या सर्वांना याची भीती वाटणे स्वभाविक आहे. परंतु, अनेकदा याचे निदान हे लवकर होत नाही. या कर्करोगाची लक्षणे काही केसेसमध्ये लवकर आढळून येतात तर काही केसेसमध्ये लवकर आढळून येत नाही. मात्र, जेव्हा आढळतात तोपर्यंत हा कर्करोग तिसऱ्या-चौथ्या स्टेजवर पोहचलेला असतो. ही अतिशय गंभीर आणि चिंतेची बाब आहे.

एक महत्वाची आणि चिंतेची बाब म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर पूर्ण बरा झाल्यानंतर तो १० वर्षांच्या आत पुन्हा परतण्याची शक्यता ३०-६० ट्कके असते. कॅन्सर पुन्हा परतण्याच्या या स्थितीला Metastatic असे म्हटले जाते.

स्तनाच्या कर्करोगाचे निदान हे कोणत्या टप्प्यावर झाले ? हे फार महत्वाचे ठरते. कारण, या सगळ्याचा कॅन्सर परतण्याच्या किंवा मेटास्टॅटिक (Metastatic) च्या शक्यता यावर प्रभाव पडू शकतो.

Metastatic Breast Cancer
Cancer Prevention: कर्करोगापासून वाचायचंय? मग या व्हिटॅमिन्सचा आहारात समावेश करा

कॅन्सर मेटास्टॅटिक झाला म्हणजे काय ?

सर्वात आधी आपण कॅन्सर मेटास्टॅटिक (Metastatic) झाला म्हणजे काय? हे जाणून घेऊयात. मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर (MBC) हा चौथ्या टप्प्यावर होणारा स्तनाचा कॅन्सर आहे.

हा कॅन्सर स्तन आणि स्तनाच्या आसपासच्या क्षेत्राबाहेर झालेली वाढ दर्शवतो. शिवाय, मेंदू, फुफ्फुस आणि यकृत यांच्यापर्यंत झालेली या कॅन्सरची वाढ देखील यातून दिसून येते. ही स्थिती दिसून आली की, कॅन्सर मेटास्टॅटिक झाला असे म्हटले जाते. मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यावर रूग्णाला काळजी आणि भिती वाटणे साहजिक आहे.

Metastatic Breast Cancer
Cancer Patients: कॅन्सर कमी वयाच्या लोकांनाही घेतोय आपल्या विळख्यात; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर आणि उपचारपद्धती

मूळात आपल्याकडे कॅन्सरचे नाव जरी घेतले तरी त्याबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज दिसून येतात. जसे की, आता त्या व्यक्तीचे काही महिन्यांचे आयुष्य राहिले आहे. त्यामुळे, हे गैरसमज आधी रूग्णाच्या मनातून काढून टाकणे हे महत्वाचे आहे.

कारण, मेटास्टॅटिकची परिस्थिती ही प्रत्येक रूग्णामध्ये वेगळी असू शकते. त्यावर जर वेळीच उपचार झाले आणि त्याला रूग्णाची व्यवस्थित साथ असेल तर मेटास्टॅटिक देखील बरा होऊ शकतो. या सगळ्यात आधुनिक उपचार पद्धती ही प्रमुख भूमिका बजावते हे समजून घेणे महत्वाचे आहे.

या उपचार पद्धतींमध्ये कॅन्सरची वाढ थोपवण्याची शक्यता असते. मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर जर व्यक्तीच्या स्तनांबाहेर जरी पोहचला तरी तो कॅन्सर थोपवण्याची क्षमता आधुनिक उपचारांमध्ये आहे. यामुळे रूग्ण यातून बरा होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. या उपचार पद्धतींमध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये सातत्याने बदल होत आहेत.

या सगळ्यामध्ये रूग्णाने आपल्या मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरबद्दल डॉक्टरांशी मोकळेपणाने संवाद साधणे महत्वाचे आहे. डॉक्टरांना सर्व गोष्टींची तपशिलावर माहिती देणे महत्वाचे आहे. कारण, डॉक्टरांना जर तुमच्या स्थितीची पूर्ण माहिती असेल तरच ते त्याप्रमाणे तुमच्यावर उपचार करू शकतील.

Metastatic Breast Cancer
Cancer Patients in India: भारतातल्या ६९ लाख महिलांना कॅन्सरपासून वाचवता आलं असतं; जाणून घ्या नक्की कुठे बिनसलं?

रूग्णाने यासोबतच संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती घेणे हे देखील महत्वाचे आहे. या सर्व गोष्टींचे वेळापत्रक तुमच्या डॉक्टरांना विचारून आणि तुमच्या उपचार पद्धतींशी सुसंगत असणे महत्वाचे आहे.

आधुनिक उपचार पद्धती आणि त्यासोबतच मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर (MBC) कडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील महत्वाचा आहे. त्यामुळे, घाबरून जाण्याचे कारण नाही.

योग्य उपचार, आहार, व्यायाम आणि आराम यांचा योग्य समतोल साधला तर मेटास्टॅटिक बेस्ट कॅन्सरला हरवता येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()