Stockholm Syndrome: तुम्ही अनेकवेळा असे ऐकले असेल की कोणीतरी महिलेचे मानसिक शोषण करते तिचे अपहरण करते आणि ती त्या व्यक्तीच्या प्रेमात पडते. बॉलिवूड आणि हॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये अशी घटना दाखवली आहे. बॉलिवूडमधील 'हायवे' या चित्रपटात देखील अशी घटना दाखवली होती. या चित्रपटात रणदीप आलियाचे अपहरण करतो आणि आलिया त्याच्या प्रेमात पडते. ही एक मानसिक प्रवृती असून याला 'स्टॉकहोम सिंड्रोम' असे नाव देण्यात आले आहे. 'स्टॉकहोम सिंड्रोम' म्हणजे काय आणि त्याला हे नाव कसे पडले हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.