Sex Drive : वयाच्या चाळीशीनंतर सेक्स करू न वाटणे नॉर्मल आहे का?

आज आपण आपले वय आणि शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा यात काय कनेक्शन आहे, याविषयी जाणून घेणार आहोत.
Sex Drive
Sex Drivesakal
Updated on

Sex Drive : शारिरीक संबंध ठेवणे ही मुडशिवाय अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. यात आपल्या वयाचाही मोठा रोल असतो. आज आपण आपले वय आणि शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा यात काय कनेक्शन आहे, याविषयी जाणून घेणार आहोत. ( what is the reason of low Sex Drive after the age of 40 is normal or not?)

वयाच्या चाळीशीनंतर शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होणे, नॉर्मल आहे का?

वयाच्या चाळीशी नंतर सेक्स ड्राईव्ह म्हणजेच शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते. यामागे बॉडीमधील काही हार्मोन्स जबाबदार असतात. सोबतच घर आणि मुलांची जबाबदारी यामुळे असणारा स्ट्रेस, थकवा आणि विकनेस, अपुर्ण झोप यामुळे सेक्स ड्राइव्ह लो होण्याची शक्यता वाढते.

Sex Drive
Same Sex Marriage : समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास केंद्राचा नकार; SCमध्ये प्रतिज्ञापत्र

पुरुषांमध्ये कोणत्या वयापासून सेक्स ड्राइव्ह कमी होतो?

वयाच्या चाळीशीनंतर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन लेव्हेल प्रत्येक वर्षी 1-1 टक्के कमी होतो. हा हार्मोन्स सेक्स ड्राइवसाठी जबाबदार असतात जो महिला आणि पुरुष दोघांमध्ये असतो. महिलांमध्ये हार्मोनची लेव्हेल मेनोपॉजनंतर कमी होण्यास सुरवात होते. जे पुढे लो सेक्स ड्राइव्हचं कारण ठरतं.

लो सेक्स ड्राइव्ह कसा दूर करायचा?
हेल्दी लाइफस्टाइल आणि स्ट्रेस मॅनेजमेंटमुळे महिला आणि पुरुषांमधील लो सेक्स ड्राइव्हची समस्या दूर केली जाऊ शकते.

Sex Drive
Heart Attack Symptoms: 'या' वयोगटातील महिलांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका, वेळीच लक्षणे ओळखा नाहीतर...

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.