Heart Attack: तुम्ही हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटका ऐकल्या असेल. सध्या हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होणे गंभीर समस्या बनली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना या आजाराचा धोका आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हृदयविकाराच्या घटकांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे , ज्यामध्ये एका बस चालकाचा गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे.