What Is Trauma : सतत चर्चेत येणारा ट्रॉमा म्हणजे नक्की काय आहे? जाणून घ्या प्रकार,कारण आणि उपाय

What Is Trauma : तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ट्रॉमा आहे हे कसं ओळखाल?
What Is Trauma
What Is Trauma esakal
Updated on

What Is Trauma :

गेल्या काही दिवासांपासून बिग बॉसची चर्चा सर्वत्र आहे. बिग बॉसमधील कलाकारंसह एक शब्द वारंवार चर्चेत येत आहे. तो म्हणजे ट्रॉमा. बिग बॉसला सुरूवात झाली अन् अंकिता वालावलकरने ‘मला भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे’ तर निक्की तांबोळीने मला अंधाराचा ट्रॉमा आहे असे म्हटले.

या दोघींच्या बोलण्यातून ट्रॉमा हा शब्द चर्चेत आला. ट्रॉमा म्हणजे एक प्रकारची भिती किंवा दडपण असे असू शकते, याचा अंदाज येतो. पण, ट्रॉमा म्हणजे नक्की काय, त्याची लक्षणे अन् उपाय जाणून घेऊयात.

What Is Trauma
Yoga For Mental Health : मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोज १० मिनिटे ‘या’ योगासनांचा करा सराव, तणावाची होईल सुट्टी..!

शास्त्रीय भाषेत ट्रॉमा ही एखाद्या भयानक घटनेची प्रतिक्रिया असू शकते. एखादी गोष्ट घडल्याने त्याबद्दलची मनात बसलेली भिती असे असू शकते. यामुळे व्यक्ती खूप तणावग्रस्त होते.

कौटुंबिक अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा वैयक्तिक अपघातामुळे असा ट्रॉमा होऊ शकतो. ट्रॉमा हा आजार बरा होत नाही, असे नाही. तर तो समुपदेशन, योग्य काळजी आणि उपचाराने तो बरा होऊ शकतो.

What Is Trauma
Yoga For Mental Health : मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोज १० मिनिटे ‘या’ योगासनांचा करा सराव, तणावाची होईल सुट्टी..!

ट्रॉमा हा नवा आणि जुना अशा दोन प्रकारचा असू शकतो. ट्रॉमा या स्थितीमागे बरीच कारणं असू शकतात. मात्र यामुळे व्यक्तिची संपूर्ण दिनचर्या प्रभावित होते. त्यामुळे या स्थितीतून वेळीच बाहेर येणे फार गरजेचे आहे.

What Is Trauma
Yoga For Mental Health : मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोज १० मिनिटे ‘या’ योगासनांचा करा सराव, तणावाची होईल सुट्टी..!

ट्रॉमाचे आहेत एवढे प्रकार

सिंगल इंसिडेंट ट्रॉमा - या प्रकारचा ट्रॉमा एकमेव चिंतीत करणाऱ्या घटनेचा इशारा देतो. जसे, अपघात, हल्ला किंवा नैसर्गिक आपत्ती. याप्रकारच्या स्थितीत हीलिंगचा फोकस हा त्या विशिष्ट घटनेशी संबंधित भावनांवर असतो.

कॉम्प्लेक्स ट्रॉमा - जेव्हा एखाद्या व्यक्तीस दीर्घकाळापर्यंत दु:खद अनुभव येतात तेव्हा त्या स्थितीला कॉम्प्लेक्स ट्रॉमा असे म्हणतात. यात बालपणापासूनच चुकीची वागणूक, हिंसाचार यांसंबंधित ट्रॉमा यांचा समावेश असू शकतो. या स्थितीत ट्रॉमा किंवा हीलिंगचा उद्देश्य हा ट्रॉमाचा प्रभाव आणि लक्षणे कमी करणे हा असतो.

डेव्हलपमेंट ट्रॉमा - हा ट्रॉमा उपेक्षा, जवळीक किंवा बालपणापासूनचा एखादा ट्रॉमा याचे मुख्य कारण असू शकते. यात थेरपी आणि हीलिंगच्या माध्यमातून व्यक्तीच्या भावना, संबंध आणि सुरुवातीच्या दिवसांचा त्याच्यावर पडलेले प्रभाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

What Is Trauma
Children Mental Health : लहान मुलांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी मोकळा संवाद महत्वाचा ; कशी कराल सुरूवात?

तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ट्रॉमा आहे हे कसं ओळखाल?

  • अनेक कारणांमुळे ट्रॉमा होऊ शकतो. घरगुती हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती, गंभीर आजार किंवा दुखापत, एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू यामुळे मनावर आघात होऊ शकतो.

  • लैंगिक शोषण, बलात्कार, लैंगिक अत्याचार किंवा छळ यासारख्या हिंसाचाराच्या घटनेला बळी पडल्याने एखाद्या व्यक्तीला मानसिक आघात होऊ शकतो.

  • टीव्ही, चित्रपट किंवा इंटरनेटवर अशी एखादी घटना पाहणे हे देखील ट्रॉमा होण्याचे कारण असू शकते.

ट्रॉमावर काय उपाय करता येतात?

योगा आणि ध्यान - ट्रॉमा स्थितीत योग आणि ध्यान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे मन आणि हृदय शांत होते. यामुळे तणाव कमी होतो आणि तुम्हाला बरे वाटते.

आर्ट थेरपी: मनात आघात झाल्यास आर्ट थेरपीचीही मदत घेतली जाऊ शकते. यामध्ये संगीत, नृत्य इत्यादींचा समावेश असू शकतो.

एनर्जी : आघात झाल्यास एनर्जी बेस्ड थेरपी घेणे फायदेशीर ठरू शकते. यात चक्र संतुलन, एंजल हीलिंग, रेकी किंवा कलर थेरपी इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे शरीरातील ऊर्जेचा प्रवाह वाढतो. (Mental Health)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.