West Nile Fever : जगभरातील लाखो लोकांना संसर्ग झालेल्या विषाणूंवर संधोधन करणाऱ्या डॉ. अॅंथोनी फौसी यांना नुकतीच वेस्ट नाईल फीवरची लागण झाली आहे. वेस्ट नाईल फीवर हा एक प्रकारचा संसर्गजन्य आजार आहे. मच्छर चावल्यामुळे हा संसर्ग पसरतो. वेस्ट नाईल फीवरची लागण झालेल्या डॉ. फौसींवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू असून, हा आजार नेमका काय आहे? आणि त्याची लक्षणे काय आहेत? ते आपण जाणून घेणार आहोत.