Zero Oil Cooking : हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारे 'झीरो ऑईल कुकिंग' काय आहे? जाणून घ्या याचे फायदे

रोजचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या समस्यांमध्ये लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा समावेश आहे.
Zero Oil Cooking
Zero Oil Cooking esakal
Updated on

Zero Oil Cooking : रोजचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या समस्यांमध्ये लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा समावेश आहे. निरोगी हृदयासाठी लोक विविध प्रकारचे डाएट प्लॅन्स आणि व्यायाम यांचा रूटीनमध्ये समावेश करतात.

मात्र, अनेकदा लोक स्वयंपाकघरात वापरलेले तेल खाण्याचे टाळतात. कारण, हे वापरलेले तेल दीर्घकाळ वापरल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे, निरोगी हृदयासाठी तुम्ही आहारात तेलाचा जास्त वापर करणे टाळा, हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे, अनेक जण आता झीरो ऑईल कुकिंगचा पर्याय स्विकारताना दिसत आहेत.

Zero Oil Cooking
Mediterranean Diet : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असणारे मेडिटेरिनियन डाएट आहे तरी काय? जाणून घ्या ‘हे’ फायदे

झीरो ऑईल कुकिंग काय आहे?

झीरो ऑईल कुकिंग म्हणजे अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून अन्न शिजवणे होय. शरीरातील अतिरिक्त तेल हे कर्करोग, फॅटी लिव्हर, कॉलेस्ट्रॉल, मधुमेह इत्यादी अनेक समस्यांना कारणीभूत ठरते. त्यामुळे, आहारात जास्तीत जास्त तेलाचा वापर करणे शक्यतो टाळा. दिवसाला ३ चमचे म्हणजेच १५ ग्रॅम तेलाचा वापर केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे, ज्यांना हृदयाच्या समस्या आहेत, अशा लोकांनी झीरो ऑईल कुकिंगचा पर्याय स्विकारावा.

झीरो ऑईल कुकिंगचे आरोग्याला होणारे फायदे

कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करते

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे, हे अतिशय महत्वाचे आहे. जर अशा स्थितीमध्ये तुम्ही झीरो ऑईल कुकिंगचा वापर केल्याने केवळ कॅलरीजचे प्रमाण कमी होत नाही तर आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होते. कमीत कमी तेलात शिजवलेल्या अन्नाचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर

झीरो ऑईल कुकिंगचा पर्याय स्विकारल्याने आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे, छातीत दुखणे, हृदयविकाराचा झटका येणे, पशाघात इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो. तेलाचा अतिरिक्त वापर केल्याने शरीरातील ट्रायग्लिसराइडची पातळी वाढते, ज्यामुळे चरबीचे प्रमाण वाढते.

चरबी वाढली की हृदयविकाराचा धोका वाढतो. परिणामी झिरो ऑईल कुकिंग केल्याने शरीरातील ट्रान्स फॅटचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे, आपोआप हृदयाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

Zero Oil Cooking
Weight Loss journey : वजन कमी करायचे आहे? मग, आहारात समाविष्ट करा ‘हे’ झीरो कॅलरीज फूड्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.