Zika Virus: पुण्यात सापडले 'झिका'चे 2 रुग्ण; काय काळजी घ्याल ?

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा आजार आहे.
What precautions should you take from the Zika Virus
What precautions should you take from the Zika Virus
Updated on

ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव झाला आहे. कोथरूडच्या एरंडवणे भागातील एका 46 वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीमधे झीकाची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळं परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा आजार आहे. हे डास खरतर अमेरिकामध्ये आढळतात. डोकेदुखी, स्नायुंचा त्रास, शरिरावर बारिक पुरळ, लाल चट्टे उठणे, ताप ही या झिका आजाराची लक्षणे आहेत. तर या आजारापासून सावध राहण्यासाठी कोणते उपाय कराल पुढिलप्रमाणे...

What precautions should you take from the Zika Virus
Zika Virus : सावधान! डेंगीचाच डास झिका संसर्गाला कारणीभूत; गर्भवतीला संसर्ग झाल्यास बाळाच्या मेंदूवर परिणाम
  • झिका विषाणूपासून बचाव करण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नका. कारण पाणी साचलेल्या डबक्यामध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते.

  • घरामध्ये डास शिरणार नाही याची काळजी घ्या.

  • डास चावणार नाही याची काळजी घ्या. घरात डास आले तर त्यासाठी कडुलिंबाचा पाला जाळा.

  • संध्याकाळी दारे खिडक्या उघड्या ठेऊ नका.

What precautions should you take from the Zika Virus
Nashik Zika Virus Update: झिका रुग्ण आढळलेल्या भागात मच्छरदाणी वापरा! वैद्यकीय विभागाचा नागरिकांना सल्ला
  • गडद रंगाचे व तोकडे कपडे वापरु नये.

  • कापराचा वापर करून तुम्ही १५ ते २० मिनिटात डासांना दूर पळवू शकता.

  • कडुलिंब आणि नारळाचं तेल एकत्र करून आपल्या शरीरावर चोळा.

  • दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

या व्हायरसची लागण झाली तर काय करावे?

झिका व्हायरस आपल्या शरीरात किमान आठवडाभर राहतो. त्यामुळे तुम्हाला याचे कोणतेही एक लक्षण जरी जाणवले तरी लगेचच ब्लड आणि युरीन टेस्ट करा आणि डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.