Cholesterol Level In Male : पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असावी? जाणून घ्या एका क्लिकवर

पुरुषांमधे योग्य कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असावी हे माहिती असणे गरजेचे आहे
Cholesterol Level In Male
Cholesterol Level In Maleesakal
Updated on

Cholesterol Level In Male : हल्ली धावपळीच्या आयुष्यात स्त्री-पुरुषांमधे वेगवेगळ्या समस्या वाढीस लागल्या आहेत. अशातच पुरुषांच्या समस्या काही कमी नाही. पुरुषांमधे स्पर्म काउंट कमी होणे, खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे यांसारख्या समस्या वेगाने वाढताय. तेव्हा पुरुषांमधे योग्य कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असावी हे माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला कुठलीही समस्या उद्भवण्याआधीच आरोग्यविषयक सजगता राहील.

कोलेस्ट्रॉल हा एक चिकट द्रव आहे जो आपल्या रक्तामध्ये असतो. हे रक्ताच्या प्लाझ्माद्वारे वाहून नेले जाते. आपल्या शरीरात 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. पहिले म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणजेच एलडीएल, त्याला गुड कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) असेही म्हणतात आणि दुसरे बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol), ज्याला शरीरासाठी खराब असणारं कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात. खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ शकते, ज्यामुळे अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो.

पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉलची लेव्हल किती असावी?

20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांच्या शरीरातील एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी 125-200 mg/dl च्या दरम्यान असावी. त्याच वेळी, नॉन-HDL पातळी 130 mg/dl पेक्षा कमी आणि LDL पातळी 100 mg/dl पेक्षा कमी असावी. त्याच वेळी, HDL पातळी 40 mg/dl किंवा अधिक असणे आवश्यक आहे.

Cholesterol Level In Male
High Cholesterol : लहान मुलांमध्येही वाढतोय कोलेस्ट्रॉलचा धोका, नियंत्रणात ठेवण्यासाठी करा हे उपाय

विशी उलटलेल्या महिलांमधे कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असावी?

20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांच्या शरीरातील एकूण कोलेस्ट्रॉल 125-200 mg/dl च्या दरम्यान असावे. याव्यतिरिक्त, नॉन-HDL पातळी 130 mg/dl पेक्षा कमी आणि LDL पातळी 100 mg/dl पेक्षा कमी असावी. HDL पातळी 50 mg/dl किंवा त्याहून अधिक असावी. कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राखणे खूप महत्वाचे आहे, कारण कोलेस्टेरॉलची पातळी खालावल्यावर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. (Health News)

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय

बेसन - बेसनमध्ये फायबर, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, पोटॅशियम, कैल्शियम भरपूर प्रमाणात असतात. आणि हे सर्व पौष्टिक तत्व हृदयासाठी अतिशय महत्वाची आहेत. इतकंच नाही तर डायबिटिज रुग्णांसाठी तर हे वरदान आहे.

शरीरातील शुगर वितळून शरीराबाहेर काढण्याची ताकद एकट्या बेसनात आहे. इतकंच काय बेसनाच्या सेवनाने शरीरातील घाणेरडं कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()