Diabetes Care: उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. कडक उन्हामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) नोंदणीनुसार एप्रिलमध्ये भारतात कडाक्याचा उन्हाळा जाणवला, तसेच अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट दिसून आली.
उन्हाळ्यातील वाढते तापमान आणि उष्णतेच्या लाटांसह मधुमेह असलेल्या व्यक्तीनी काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यात पाणी आणि मीठाचे प्रमाण कमी होते. तसेच डिहायड्रेशन आणि उष्णतेमुळे थकवा जाणवतो. उन्हामुळे येणाऱ्या थकव्यासह रक्तातील शर्करेच्या पातळ्यांचे व्यवस्थापन करणे अवघड असते. यामुळे मधुमेहींना काळजी घेणे गरजेचे आहे.
मुंबईतील डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल पवईचे मेटबोलिक फिजिशियन डॉ. विमल पहुजा म्हणाले, ''मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्यदायी नित्यक्रम राखणे आवश्यक आहे, पण उन्हाळ्यादरम्यान अनेकदा त्यामध्ये व्यत्यय येतात. दैनंदिन सवयींमध्ये बदल केल्यास मधुमेह-अनुकूल आहाराचे पालन करण्यामध्ये किंवा वेळेवर रक्तातील शर्करेच्या पातळ्यांची तपासणी करण्यामध्ये चूक होऊ शकते.
तसेच, कडक उकाड्यादरम्यान मधुमेह असलेल्या व्यक्तींना विशेषत: त्यांच्या रक्तातील शर्करेच्या पातळ्या अनियंत्रित राहिल्यास डिहायड्रेशनचा उच्च धोका असतो. रक्तातील शर्करेच्या पातळ्यांचे प्रभावीपणे संतुलन राखण्यासाठी कन्टिन्युअल ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM) सारख्या उपाययोजनांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. स्मार्टफोनशी सुसंगत असलेले सीजीएम डिवाईस चालता-फिरता रिअल-टाइम मॉनिटरिंग देते, मधुमेह व्यवस्थापनाबाबत तडजोड न करता नित्यक्रमामधील बदलांना प्रतिबंध करते.''
मधुमेहींनी उन्हाळ्यात रक्तातील शर्करेच्या पातळ्या संतुलित ठेवणे गरजेचे आहे. कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM) डिवाईसचा वापर करत हे साध्य करता येते. सीजीएम डिवाईस बोटाला टोचण्याची गरज न लागता रक्तातील शर्करेच्या पातळ्यांबाबत माहिती देतात. अशा डिवाईसमध्ये टाइम इन रेंज सारखे मेट्रिक्स असतात आणि रीडिंग्ज तपासण्यामधून सानुकूल रेंजमध्ये अधिक वेळ व्यतित होण्याची खात्री मिळते. यामुळे रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर नियंत्रण राहू शकते.
हायड्रेट राहावे
उन्हाळ्यात हायड्रेट राहावे. दिवसभराक ६ ते ७ ग्लास पाणी प्यावे. योग्य हायड्रेशनमुळे रक्तातील शर्करेच्या पातळ्यांचे नियमन करण्यामध्ये मदत होण्यासोबत रक्तप्रवाहामधील टॉक्झिन्स उत्सर्जित देखील होतात. मधुमेहींनी भरपुर प्रमाणात पाणी प्यावे. कमी पाणी प्यायल्याने रक्तातील शर्करेच्या पातळ्या वाढतात, रक्तातील शर्करेच्या उच्च पातळ्यांमुळे सतत लघवी होते, परिणामत: डिहायड्रेशन होते. व्यक्तीने दिवसाला किमान २ लीटर पाणी प्यावे.
रक्तातील शर्करेची पातळी तपासावी
मधुमेहींनी रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर सतत देखरेख ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फ्रीस्टाइल सारखे प्रगत सेन्सर-आधारित कन्टिन्युअल मॉनिटरिंग डिवाईसेच्या मदतीने पातळी तपासू शकता. हे डिवाईसेस रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवतात आणि त्यामध्ये चढ-उतार झाल्यास अचूक, रिअल-टाइम अलर्टस् देतात. ज्यामुळे तुम्हाला रक्तातील शर्करेच्या पातळ्यांमध्ये अचानक होणाऱ्या चढ-उताराबाबत चिंता करण्याची गरज भासत नाही.
योगा करावा
मधुमेहींनी नियमितपणे योगा करावा. तसेच उन्हाळ्यात देखील त्यांना कोणताही त्रास होणार नाही. सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा बाहेर जाऊन व्यायाम करता येऊ शकतो, पण उष्ण तापमानादरम्यान इनडोअर जिममध्ये जाणे किंवा घरामध्येच व्यायाम करणे उत्तम आहे.
पौष्टिक आहार
उन्हाळ्या दरम्यान मधुमेहींनी आहाराची काळजी घ्यावी. आहारात सेलेरी व ब्रसेल स्प्राऊट्स सारख्या उच्च फायबर असलेल्या भाज्या व पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश केल्यास रक्तातील शर्करेच्या पातळ्यांचे नियमन करण्यास मदत होऊ शकते. तसेच, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दैनंदिन आहारामध्ये संत्री, लिंबू व आवळा यांसारख्या लिंबूवर्गीय फळांचा समावेश करता येऊ शकतो, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी संपन्न प्रमाणात असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.