Jackfruit Worst Combination : उन्हाळ्यात आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणजे फणस होय. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फणस खायला आवडते. फणसाचे केवळ गरच खाल्ले जात नाहीत तर त्यापासून भाजी देखील बनवली जाते. फणसामध्ये व्हिटॅमिन अ, क, कॅल्शिअम, लोह, झिंक आणि पोटॅशिअमचे विपुल प्रमाण आढळून येते. त्यामुळे, फणस आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
परंतु, फणस खाल्ल्यानंतर किंवा फणसाची भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही काही गोष्टींचे सेवन करणे टाळायला हवे. अन्यथा तुमची पचनसंस्था बिघडू शकते. त्यामुळे, फणसाचे सेवन केल्यावर काही गोष्टी खाणे टाळा. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.
फणस खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे योग्य नाही. त्यामुळे, फणसाचे सेवन केल्यावर लगेच दूध पिणे टाळा. जर तुम्ही असे केले तर तुमची पचनक्रिया बिघडू शकते. पोटात गॅस होणे, पित्त आणि अपचनसारख्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. दूधामध्ये असलेले कॅल्शिअम फणसात आढळणाऱ्या ऑक्सलेटवर प्रतिक्रिया देते त्यामुळे, फणस खाल्यावर लगेच दूध पिण्यापेक्षा काही वेळाने प्यावे.
फणस खाल्ल्यानंतर भेंडीचे सेवन करणे टाळा. फणसावर भेंडीचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. फणसामध्ये असलेले काही संयुगे भेंडीमध्ये आढळणाऱ्या संयुगांसह एकत्रित होऊन त्वचेवर अॅलर्जी निर्माण करू शकतात. यामुळे, त्वचेवर पुरळ येणे, जळजळ होणे इत्यादी समस्या होऊ शकतात. त्यामुळे, फणस खाल्ल्यावर भेंडीचे सेवन करू नका.
फणस खाल्ल्यानंतर त्यावर लगेच पपई खाऊ नका, यामुळे, आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पपईमध्ये असलेले कॅल्शिअम फणसामध्ये आढळणाऱ्या ऑक्सलेट नावाच्या घटकावर प्रतिक्रिया देते. जे हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे, फणस खाल्ल्यावर लगेच पपईचे सेवन करू नका. त्याऐवजी २-३ तासांनी पपईचे सेवन करा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.