Diabetes: मधुमेह होऊ नये अन् झाला तर काय करावे? आरोग्य शिबिरात घेतली माहिती

Diabetes: मधुमेह होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, झालाच तर त्यावर न घाबरता कोणते उपाय करावेत, याबाबत पाचदिवसीय मधुमेह निवारण शिबिरात नागरिकांनी माहिती जाणून घेतली.
Diabetes
DiabetesSakal
Updated on

Diabetes: मधुमेह होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, झालाच तर त्यावर न घाबरता कोणते उपाय करावेत, याबाबत पाचदिवसीय मधुमेह निवारण शिबिरात नागरिकांनी माहिती जाणून घेतली. साताऱ्यातील त्रिभुवनेश्वर महादेव मंदिर येथे भारतीय योग संस्थानच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मंगळवारी (ता.११) डॉ. नंदकुमार नील, डॉ. उत्तम काळवणे, भाऊ सुरडकर, संजय औरंगाबादकर, शोभा बुरांडे, शिबिर प्रमुख कांचन चांदवानी, कविता नंदनवार यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. डॉ. संजय पडोळे यांनी आहारात काय खावे आणि काय खाऊ नये याची माहिती दिली. मधुमेह झाला तर त्यावर योग्य आहार, योगासने, तणावरहित दिनचर्या आचरणात आणून मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते.

Diabetes
Sweet Potato: पंचायतच्या फेमस डायलॉगमधला अलहुआ करतो शुगर कंट्रोल, जाणून घ्या फायदे

पॅकबंद पदार्थ खाऊ नयेत, साखर, दूध हे पदार्थ टाळावेत. संपूर्ण आठ तासांची झोप अत्यंत महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. ललित कासार, सविता सपकाळे, गणेश पाटील यांनी भजन सादर केले. ज्येष्ठ बासरीवादक निवृत्त तहसीलदार बाबूराव दुधगावकर यांनी बासरीवर गीत ऐकवले‌. शनिवारी (ता.१५) शिबिराचा समारोप झाला. योग शिक्षक म्हणून रजनी सुरडकर, ममता शर्मा, कविता नंदनवार, छाया कालिके, दिलीप तोडेवाले, ललित कासार, अरुण थोरात, कांचन चांदवानी, अनघा जोशी, संगीता नारखेडे, गणेश पाटील, संगीता नारागुडे, हर्षदा पटेल, अस्मिता बनसोड, वंदना पाटील, गणेश पाटील, दीप्ती बोराळकर, कोमल भागवतकर यांनी योग वर्ग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.