मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचं विशिष्ट वय असतं. पण सध्याची बदलती जीवनशैली पाहता कमी वयातच मुलींना पाळी येत आहे. पुर्वी मासिक पाळी ही मुलींना वयाच्या 11 ते 15 वर्षादरम्यान येत असे. पण १० वर्षांच्या आतील मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचं प्रमाण वाढलं असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालाकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या मुलींच्या आई वडिलांना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर असे का होत आहे हे जाणून घेऊया.
मुलींना पाळी साडे दहा ते अकरा वर्षांच्या दरम्यान येते. जर पाळी दहा वर्षांच्या आत आली तर त्याला पाळी लवकर येणं किंवा 'अर्ली मेनार्की' असं म्हणतात. याला वैद्यकीय भाषेत प्रिकॉशस प्युबर्टी असंही म्हणतात. प्रिकाॅशस म्हणजे वेळेआधीच पाळी येणं असं म्हणतात.
जामा नेटवर्क ओपन जर्नलने अमेरिकेत केलेल्या संशोधनानुसार, अमेरिकेतील मुलींना 1950 आणि 60 च्या दशकाच्या तुलनेत सरासरी 6 महिने आधी मासिक पाळी येते. या संशोधनानुसार, आता वयाच्या 9 व्या वर्षी मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होते.
संशोधकाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 71,000 हून अधिक महिलांवर हे संशोधन केले होते. महिलांनी शेअर केलेल्या डेटावरून असे आढळून आले की 1950 ते 1969 या काळात मासिक पाळी वयाच्या 12.5 व्या वर्षी सुरू झाली, तर 2000 ते 2005 या काळात मासिक पाळी वयाच्या 11-12 व्या वर्षी सुरू झाली.
आता 11 वर्षापूर्वी मासिक पाळी येणा-या मुलींची संख्या 8.6% वरून 15.5% पर्यंत वाढली आहे आणि 9 वर्षापूर्वी मासिक पाळी येणा-या मुलींची संख्या दुपटीने वाढली आहे.
पीरियड्सचे बदलते ट्रेंड समजून घेणे गरजेचे आहे. संशोधनात असेही आढळून आले आहे की बहुतेक मुलींना नियमित मासिक पाळी येत नाही. अनियमित मासिक पाळीमुळे मुलींमध्ये अनेक आजार वाढत आहेत, ज्यामध्ये पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा पीसीओएसचाही समावेश होतो.
मुलींमध्ये लवकर मासिक पाळी येणे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा दावा संशोधनात करण्यात आला आहे. यामुळे मुलींमध्ये हृदयविकार, लठ्ठपणा, गर्भपात आणि लवकर मृत्यूचा धोका वाढतो. यासोबतच मासिक पाळी लवकर येण्यामुळे अंडाशय आणि स्तनाचा कर्करोग यांसारखे विविध कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो.
संशोधकाच्या मते, "जर एखाद्या मुलीला 12 वर्षांच्या आधी मासिक पाळी सुरू झाली तर तिला स्तनाच्या कर्करोगाचा धोका 20% वाढतो."
असं होण्यामागे काय आहे कारण?
संशोधकांच्या मते, मुलींना एवढ्या लवकर मासिक पाळी येण्यामागे एक नाही तर अनेक कारणं आहेत. जी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, यातील एक पैलू म्हणजे मुलींमधील वाढता लठ्ठपणा. आता लहान वयाची मुलेही लठ्ठपणाचे बळी ठरत आहेत. अशा परिस्थितीत लहानपणापासूनच लठ्ठ असलेल्या मुलींमध्ये लवकर मासिक पाळी येण्याचा धोका खूप जास्त असतो. याशिवाय, तणाव हे देखील यामागे एक मोठे कारण आहे.
जेव्हा आपण तणावग्रस्त असतो, तेव्हा आपल्या शरीरात अधिक कॉर्टिसोल हार्मोन्स आणि एंड्रोजन हार्मोन्स सोडले जातात. फॅट टिश्यू या हार्मोन्सचे इस्ट्रोजेनमध्ये रूपांतर करतात, ज्यामुळे स्तन मोठे होतात. इस्ट्रोजेन सोडण्याच्या पातळीतील हा बदल शरीरात मासिक पाळी सुरू झाल्याचे देखील सूचित करतो.
हवेतील प्रदुषण देखील मासिक पाळी लवकर येण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आजकाल मुली वापरत असलेली कॉस्मेटिक उत्पादनांचाही यावर परिणाम होतो.
तर यावर उपाय कोणते?
संशोधकाचे म्हणणे आहे की पालकांनी मुलींच्या आहाराची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या आहारात फळं, पाले भाज्या यांचा समावेश असणं गरजेचं आहे. निरोगी आणि संपूर्ण आहार घेतल्यास अकाली यौवन आणि मासिक पाळी येण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.
आहारासोबतच नियमित व्यायाम आणि पुरेशी झोपही खूप महत्त्वाची आहे. या दोन्ही गोष्टींची काळजी घेतल्यास लवकर यौवन आणि मासिक पाळी येण्याचा धोका कमी होऊ शकतो. काही संशोधनांमध्ये, उशिरा झोपणे आणि कमी झोप लागणे हे देखील लवकर यौवनाशी जोडलेले आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की, पालकांनी अशा परिस्थितीसाठी नेहमी स्वत:ला तयार ठेवावे आणि यासोबतच त्यांनी आपल्या मुलांनाही आगाऊ माहिती देणे सुरू केले पाहिजे, जेणेकरून ते कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.