Why Cow Milk Color Is light Yellow : अनेकजण दूध पिण्याचे शौकीन असतात. काही जण सकाळ संध्याकाळा न चुकता दूध पितात. रात्री एक ग्लास दूध पिऊन झोपण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच दूध न पिण्याचे अनेक तोटेदेखील आहेत. त्यामुळे डॉक्टरांकडून नेहमी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे की, म्हशीच्या दूधाचा रंग पांढरा आणि गायीच्या दूधाचा रंग हलका पिवळा का असतो? आज आम्ही याचबद्दल माहिती सांगणार आहोत.
हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?
म्हशीचे दूध पांढरे होण्यामागे प्रथिने जबाबदार
म्हशीचे दूध गायीच्या दुधापेक्षा घट्ट आणि मलईदार असते. म्हशीच्या दुधापासून दही, तूप, पनीर, मावा मोठ्या प्रमाणावर बनवले जाते. केसीन नावाच्या प्रथिनांमुळे म्हशीच्या दूधाचा रंग पांढरा असतो.
गाईचे दूध या रोगांवर प्रभावी
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गाईच्या दूधाचे सेवन करण्यास सांगितले जाते. दूधात प्रोबायोटिक्स आढळून येतात. या प्रोबायोटिक्सच्या मदतीने शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. तसेच अन्य प्रकारच्या संसर्गाचा धोकाही कमी होतो.
ज्या व्यक्ती केस गळतीमुळे त्रस्त आहेत. अशा व्यक्तींसाठी गायीचे दूध खूप फायदेशीर मानले जाते. शरीरात व्हिटॅमिन-डी आणि झिंकसारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
यामुळे गायीच्या दूधाचा रंग असतो हलका पिवळा
जर, तुमच्या घरात गायीचे दूध येत असेल तर, ते तुम्ही बारकाईने बघितल्यास लक्षात येईल की, गायीच्या दूधाचा रंग हलका पिवळा असतो. या दूधाला हलका पिवळा रंग येण्यामागेदेखील काही कारणं आहेत. वास्तविक, गायीच्या दुधात कॅल्शियमसोबत प्रथिनेही आढळतात. या प्रोटीनचे नाव कॅरोटीन असे आहे. याच कॅरोटीनमुळे गायीचे दूध हलके पिवळे असते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.