Wisdom Teeth : तुम्हाला माहितीये अक्कल दाढ का दुखते?

चला तर जाणून घेऊया.
Wisdom Teeth
Wisdom Teethsakal
Updated on

बहुतेक अक्कल दाढ १७ ते २५ या वयोगटात फुटू लागते आणि. ही दाढ बाहेर येण्याच्या प्रक्रियेत केवळ दातच नाही तर संपूर्ण तोंड दुखू लागते. या वेदना इतक्या तीव्र असतात की ती खावस किंवा प्यावस वाटत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का अक्कल दाढ का दुखते? चला तर जाणून घेऊया. (Why do wisdom teeth cause pain read home remedies )

अक्कल दाढ का दुखते?

अक्कल दाढीच्या या तीव्र दुखण्याचे कारण आधीच जुने दात आहेत, त्यामुळे अक्कल दाढीच्या दातांना स्वतःसाठी जागा बनवावी लागते आणि त्यामुळे दातांवर आणि हिरड्यांवर खोलवर परिणाम होतो. हिरड्या कापल्या जातात किंवा सुजतात.

Wisdom Teeth
Strong Teeth: कडुनिंबाच्या काडीने दात होतात मजबूत; जाणून घ्या फायदे

अक्कल दाढेच्या दुखण्यावर काही उपाय

- दाढीच्या ठिकाणी बर्फ लावावा कारण दाढदुखीमुळे येणारी सूज किमान १५ मिनिटे लावल्यानंतर थांबेल.

- मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. काही वेळ मिठाचे पाणी तोंडात ठेवल्याने दाढदुखीत आराम मिळतो.

- कोमट पाणी तोंडात ठेवल्याने दाढीच्या दुखण्यावरही फरक जाणवतो.

Wisdom Teeth
Teeth Cleaning : महागड्या ट्रिटमेंट्स कशाला? हे घरघुती उपाय करत मिळवा मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात

- दाढदुखीवरही लवंग चांगला प्रभाव दाखवते. लवंग थेट दाढीवर ठेवा किंवा लवंग तेल कापसात भिजवा आणि काही वेळ दाढीवर ठेवा. तुम्हाला आराम मिळेल.

- तुम्ही लवंग बारीक करून दाढीवरही लावू शकता.

- सूज कमी करण्यासाठी लसणाच्या पाकळ्या ठेचून दाढीवर ठेवता येतात. त्याचप्रमाणे, आले सूज कमी करण्यास देखील मदत करते.

Wisdom Teeth
Summer Health Care : बाबांनो उन्हाळा लागला, या भाज्या आवर्जून खा

- हळदीचे औषधी गुणधर्म दाढांवर गुणकारी आहेत. तुम्ही थेट दाढीवर हळद लावा. वेदना कमी होऊ लागतील.

- एलोवेरा जेल देखील वापरू शकता. कोरफडीच्या पानांमधून थेट जेल काढा आणि दाढीवर ठेवा.

असे काही सोपे उपाय आपण करू शकतो, परंतु दाढेमुळे खूपच जास्त त्रास असेल तर मात्र डेंडिस्टचा सल्ला घ्यावा.

- डॉ अमित भोर

आहारतज्ञ आणि पोषण तज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()