देशात मागील काही महिन्यांमध्ये हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली आहे. सुरवातीला हार्ट अटॅक फक्त वयस्कर लोकांनाच येतो, असा सर्व साधारण समज होता तर आज कमी वयातील युवकांनाही हार्ट अटॅक येतोय. अशात गेल्या काही दिवसांमध्ये जिममध्ये एक्सरसाइज करताना अचानक हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाल्याचे अनेक प्रकरणे समोर आली.
राजू श्रीवास्तव, सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचा सुद्धा मृत्यू एक्सरसाइज करताना अचानक हार्ट अटॅक आल्याने झाला. पण खरंच हार्ट अटॅक आणि एक्सरसाइज एकमेकांशी निगडीत आहे? एक्सरसाइज करताना का येतो हार्ट अटॅक? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
कोरोनानंतर सुस्त लाइफस्टाइल, चुकीचं खान-पान आणि स्ट्रेस लेवल वाढल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढलाय. अनेकजण स्ट्रेसमुळे स्मोकिंग, ड्रिंकिंग सुरू करतात जे हार्ट संबंधीत आजारांना निमंत्रित करतात.
काही लोक फिटनेस फ्रीक असतात जे नेहमी जिमला जातात. काही लोक बाहेरुन फिट दिसतात मात्र आतून खूप कमजोर असतात. या वीक शरीरारावर हे लोक जोर देत एक्सरसाइज करणार ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार.
शरीरावर गरजेपेक्षा जास्त प्रेशर द्याल तर तुम्हाला थकवा जाणवू शकतो किंवा तुमचा दम भरेल किंवा हार्टमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवेल ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते.
आजकाल जिम मध्ये अनेक कमी वयाचे युवा सप्लीमेंटचा प्रयोग करतात. सप्लीमेंट प्रत्येक बॉडी टाइपसाठी व्यवस्थित नसतो. त्याचे साइड इफेक्ट काय आहे? ते कसे वापरावे? याविषयी जाणून न घेता सप्लीमेंटचा वापर करणे चुकीचं आहे. जर तुम्ही चुकीचं सप्लीमेंट्स किंवा प्रमाणाच्या बाहेक सप्लीमेंट्सचा वापर करत असाल तर तुमचा हार्ट रेट वाढू शकतो, ब्लड प्रेशर वाढू शकतो ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
एक्सरसाइज केल्याने शरिराला अनेक फायदे होतात आणि प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी दररोज 30-45 मिनिटे एक्सरसाइज केली पाहीजे. एक्सरसाइजचा अर्थ हा नाही की जिममध्ये जाऊन हेवी वजनी काहीतरी उचलणे. एक्सरसाइज म्हणजे फिजिकल अॅक्टीविटी आहे जसे री सायकिलिंग, स्विमिंग, गार्डनिंग, वॉकिंग, जिमिंग किंवा कोणतीही फिजिकल अॅक्टीविटी करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.