Health: नाकात नथ घालण्याचा अन् महिलांच्या गर्भाशयाचा आहे थेट संंबंध

Healthcare for Women: नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर टिकली स्त्रीच्या या पारंपारिक रुपाची अख्या जगाला भुरळ पडते
Why Nath Should Be Worn How Left Nostril Piercing Amazing Health Benefits
Why Nath Should Be Worn How Left Nostril Piercing Amazing Health BenefitseSakal
Updated on

प्रत्येक स्त्रीला नटायला, साज-शृंगार करायला आवडते आणि हिंदू रिती रिवाजात स्त्रीच्या शृंगारातील अविभाज्य घटक म्हणजे नथ. नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर टिकली स्त्रीच्या या पारंपारिक रुपाची अख्या जगाला भुरळ पडते.

नथ हा हिंदू संस्कृतीतील वधूच्या दागिन्यांपैकी एक महत्त्वाचा दागिना आहे. नथ हे विवाह आणि स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळं सण-समारंभ किंवा लग्न अशा विशेष कार्यक्रमांमध्ये महिला नथ परिधान करताना दिसतात.

गेल्या काही वर्षापासून नथींच्या अनेक डिझाईन बाजारात आल्या. अलीकडे मोत्याच्याच नव्हे तर ऑक्सिडाइज किंवा चांदीच्या नथी किंवा नोजपिन सुद्धा वापरल्या जातात.

पण तुम्हाला माहितीय का स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या नथीचा थेट महिलांच्या गर्भाशयाशी संबंध आहे. इतकेच नव्हे तर इतर आजारांवरही ही नथ उपयुक्त ठरते. तर आज आपण जाणून घेऊयात नथीचा आणि स्त्रीच्या गर्भाशयाची संबंध कसा येतो अन् आरोग्यासाठी का आहे फायद्याची?

तर सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊयात की नथ नेहमी डाव्या बाजूला का टोचली जाते?

नाक नेहमी डाव्या बाजूने टोचले जाते कारण येथील शिरा स्त्री प्रजनन अवयवांशी जोडलेली असते. नाकाच्या डाव्या बाजूला छिद्र केल्याने, प्रसूतीच्या वेळी स्त्रियांना कमी वेदना होतात, कारण शरीराच्या विशिष्ट दाब बिंदूंवर दबाव टाकला जातो आणि वेदना कमी होते.

तसेच, भारतीय आयुर्वेदानुसार, नाकाच्या एका भागात छिद्र पडल्याने मासिक पाळीचा त्रास बर्‍याच प्रमाणात कमी होतो. मासिक पाळीच्या वेळी अतिरिक्त रक्तस्राव होणे, पोट दुखणे, कंबर दुखणे, ऍनिमिया होणे हे त्रास कमी होतात.

यासोबत इतरही अनेक आरोग्यादायी फायदे

वात येण्याच्या समस्येपासून सुटका

आपल्या शरीरातील नाकाचे आणि कानाचे बिंदू टोचून घेऊन धातू वापरल्याने अंगातील वात येण्याची समस्या उद्भवत नाही. नाक टोचवल्याने ऍक्युप्रेशर होऊन हात पाय अकडणे, फीट येणे, अंगात कळा येणे, चमक निघणे, हाता पायांत गोळे येणे, हात पाय वाकडे होणे हे सगळे वाताचे प्रकार आपल्याला टाळता येतात.

उष्णता कमी होणे

नाक किंवा कान टोचवून घेऊन त्यात सोन्याची कुंडलं किंवा सोन्याची नथ घातल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता शोषली जाते. त्यामुळे उष्णतेमुळे होणारे आजार जसे पित्त खवळणे, अंगावर फोड पुटकुळ्या होणे, हातापायांची सालं निघणे, भेगा पडणे, नाक फुटून रक्तस्राव होणे हे त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.