तुम्हालाही Work out करताना येतात जांभया, हे आहे कारण

Yawning During Exercise: वर्कआउट करताना जांभया Yawning येण्यामागचं कारणं नेमंक काय आहे. यामागे काही गंभीर कारणं आहेत का याचा आरोग्यावर Health काही परिणाम होवू शकतो का, हे आज आपण जाणून घेणार आहोत
yawning during exercise
yawning during exerciseEsakal
Updated on

साधारण झोप आल्यावर किंवा जास्त जेवणानंतर तसचं खूप वेळ एकाच जागी बसून कंटाळा आल्याने अनेकांना जांभया Yawning येतात. याशिवाय अनेकांना वर्कआऊट म्हणजेच जीममध्ये Gymnasium व्यायाम करत असताना देखील वारंवार जांभया येत असतात. Why People Yawn while doing workout in gymnasium

वर्कआउट करताना जांभया Yawning येण्यामागचं कारणं नेमंक काय आहे. यामागे काही गंभीर कारणं आहेत का याचा आरोग्यावर Health काही परिणाम होवू शकतो का, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

स्ट्रेस किंवा चिंता- अनेकदा तणावामुळे आणि चिंतेमुळे देखील जांभया येऊ शकता. बऱ्याचदा अनेकजण वर्कआउट सुरू करण्यापूर्वी स्ट्रेसमध्ये असतात. काही वेळेस वजन कमी करण्यासाठी, अॅब्स बनवण्यासाठी व्यायाम करण्यात किंवा जास्त वेट्स उचलून वर्क आऊट करण्यात तणाव निर्माण होवू शकतो. यामुळे जांभया येऊ शकतात.

काही संशोधनाच्या मते जांभई आल्याने मेंदूमध्ये रक्तप्रवाह वाढतो ज्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते. तसचं जर तुमचं लक्ष विचलित होत असेल तर एखादं दुसरी जांभई दिल्यानंतर तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

yawning during exercise
Gym Workout: ABS बनवा घरच्या घरी, पर्सनल ट्रेनरने सांगितला अगदी सोप्पा उपाय

थकवा- अलिकडे फिटनेससाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण वर्क आउट करतात. दिवसभराच्या धावपळीतून कसाबसा वेळ काढून अनेक जण अंगात त्राण नसतानाही जिममध्ये जाऊन व्यायाम करतातय अशात शरीरात थकवा असल्याने व्यायाम करताना वारंवार जांभई येते.

जेव्हा तुमचं शरीर आधीच थकलेलं असतं तेव्हा जीममध्ये हेवी वर्कआउट करताना, वेट्स उचलताना तुम्ही अधिक थकून जाता.

हे देखिल वाचा-

yawning during exercise
Yawning Facts : दुसऱ्याला बघून आपल्यालाही जाभंई का येते?

शरीराचं तापमान- व्यायाम करताना शरीराचं तापमान सामान्य तापमानापेक्षा वाढतं. हे देखील जांभई येण्यामागचं एक कारण आहे. वर्कआउट करताना जांभई दिल्याने शरीराचं तापमान पुन्हा खाली घसरण्यास मदत होते. तापमान कमी नियंत्रणात आल्याने तुम्हाला आराम मिळतो.

व्यायामाची आवड नसणं- अनेकदा आपल्याला एखाद्या गोष्टीचा कंटाळा आल्याने देखील जांभई येते. जर तुम्हाला व्यायामामध्ये रुची नसेल किंवा दररोज एकाच प्रकारचा व्यायाम करून तुम्ही कंटाळला असाल तर तुम्हाला वर्कआउट सेशन बोरिंग वाटू शकतं आणि तुम्हाला जांभया येऊ शकतात.

याशिवाय मधुमेह, नैराश्य, पुरेशी झोप झाली नसल्यास किंवा आरोग्याच्या काही इतर कारणांमुळे देखील एक्सरसाइज करताना जांभया येतात.

हाय इम्पॅक्ट वर्कआऊट- काही विशिष्ट प्रकारच्या एक्सरसाइजमुळे देखील जांभई येऊ शकते. हाय इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग दरम्यान तुमच्या शरीराच्या सर्वच स्नायूंचा वापर होत असल्याने शरीराचं तापमान वाढतं. यामुळे जांभया येऊ लागता.

व्यायाम करताना जांभई येणं ही एक सामान्य गोष्ट आहे. वर्कआउट दरम्यान येणाऱ्या जांभई तुम्ही थांबवू शकत नाही. खरं तर शरीर थंड ठेवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी शरीराकडून होणारी ही एक नैसर्गिक क्रिया आहे.

yawning during exercise
Workout for Women: उन्हाळ्यात जिमला जावंसं वाटत नाही? महिलांनी घरीच करावा हा व्यायाम

यासाठी केवळ एक प्रयत्न म्हणून तुम्ही पुरेशी झोप घ्या तसचं थकवा दूर करण्यासाठी एनर्जी वाढवण्यासाठी योग्य आहर घ्या.

तसंच जर तुम्ही जास्त थकलेले असाल किंवा आजारी असाल तर दोन ते तीन दिवस वर्कआउट न करता विश्रांती घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()