Why Urine Infection Affect Newly Married Couples More : लग्नाच्या सुरूवातीच्या काळात अनेक स्त्रियांना युरीन इन्फेक्शनचा त्रास झाल्याच्या तक्रारी येतात. अगदी नव्याने लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांपासून ते प्रेम संबंध असणाऱ्या जोडप्यांपर्यंत अनेकांना या त्रासाला समोरं जावं लागतं. . जाणून घ्या कारणं आणि उपाय
काय आहे कारण
सामान्यतः बराचवेळ युरीनला न गेल्याने किंवा स्वच्छ वॉशरूम न वापरल्याने युरीन इन्फेक्शन होतं.
पण याशिवाय योग्य ल्युब्रिकंट न वारता वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यानं इन्फेक्शन होऊ शकतं.
याला हनीमून सिस्टिटिस म्हणतात. नवविवाहितांमध्ये हे सामान्य आहे. कारण त्यांच्यात वारंवार लैंगिक संबंध येतात.
योनी आणि मूत्रमार्ग स्त्रियांच्या शरीरात अगदी जवळ असतात. वारंवार लैंगिक संभोगामुळे, या भागाला जखमा झाल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. योनी किंवा क्लिटॉरिसच्या क्षेत्रामध्ये वारंवार घर्षण होते तेव्हा त्या भागात फोडं आणि जखम होतात.
यावर उपाय काय?
वारंवार शारीरिक संबंधातून होणाऱ्या इन्फेक्शनला टाळण्यासाठी नवविवाहितांनी चांगलं ल्युब्रिकंट वापरणं आवश्यक आहे.
संबंध ठेवण्यापूर्वी लैंगिक भागांची नीट स्वच्छता करावी.
सतत आणि भरपूर पाणी प्यावं.
संबंध ठेवण्याआधी भरपूर पाणी प्या आणि नंतरही पाणी प्या.
संबंधांनंतर १० मिनीटाच्या आत लघवी करा. यामुळे सर्व बॅक्टेरिया बाहेर पडतील.
जर तुम्ही मुल होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर शुक्राणू आत जाऊ द्या आणि १० मिनीटांनी लघवी करून बॅक्टेरिया फ्लश करा.
जोडप्यातल्या दोघांनी स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे.
पुरूषांनीही संबंधांनंतर स्वच्छता राखणं आवश्यक आहे. त्यातून इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.