Women Life : महिलाही घेतात व्हायग्रा; पण कशासाठी ?

जर एखाद्याला आधीच हृदयविकार असेल, उच्च रक्तदाबाचा त्रास असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकार असेल, तर व्हायग्रा घेणे धोकादायक ठरू शकते.
viagra
viagragoogle
Updated on

मुंबई : व्हायग्रा ही फक्त पुरुषांसाठीच असते असा गैरसमज असतो. पण तसं काही नाही. महिला ही गोळी घेऊ शकतात. फक्त पद्धत वेगळी असते.

सर्वप्रथम व्हायग्रा म्हणजे काय हे जाणून घेऊ. शरीराच्या कोणत्याही भागात रक्ताभिसरण वेगवान करण्यासाठी याचा वापर केला जातो. हे सामान्यतः इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी वापरले जाते. हे लिंगाच्या स्नायूंना रक्तपुरवठा देखील वाढवू शकते.

व्हायग्रा हे सुरक्षित औषध मानले जात असले तरी त्याचा डोस २५ मिग्रॅ ते १०० मिग्रॅ दरम्यान असावा. यापेक्षा जास्त असल्यास व्हायग्रा खूप धोकादायक ठरू शकते. (why women use viagra women physical health ) हेही वाचा - देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

viagra
Splash Pregnancy : इंटरकोर्स होत नाही; पण तरीही गर्भधारणा होते, कसं काय ?

Viagra चे धोके काय आहेत ?

जर एखाद्याला आधीच हृदयविकार असेल, उच्च रक्तदाबाचा त्रास असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकार असेल, तर व्हायग्रा घेणे धोकादायक ठरू शकते.

विशेषतः जर व्हायग्रा अल्कोहोलसोबत घेतल्यास काही रुग्णांमध्ये हायपोटेन्शन होऊ शकते, ज्यामुळे रक्तदाब अचानक कमी होतो. काहींमध्ये, यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो.

जर हृदयविकार खूप गंभीर स्थितीत असेल तर त्याचा रक्तपुरवठ्यावरही परिणाम होतो. यामुळे काही लोकांमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा मेंदूमध्ये गुठळी होऊ शकते.

अल्कोहोलसोबत व्हायग्रा घेता येईल का ?

अल्कोहोल कमी प्रमाणात असल्यास व्हायग्रा घेऊ शकता. एक किंवा दोन युनिट अल्कोहोल असलेली Viagra गोळी सहसा त्रास देत नाही. पण हे प्रमाण वाढले तर फार गंभीर समस्या उद्भवू शकतात.

viagra
Men's Health : दारू-सिगारेटचे व्यसन असणाऱ्या पुरुषांचे लैंगिक आरोग्य सुधारेल हे योगासन

महिला व्हायग्रा वापरू शकतात ?

व्हायग्रा फक्त पुरुषांसाठीच आहे असा एक सामान्य समज आहे. Viagra चा उपयोग कामवासना वाढवण्यासाठी केला जातो आणि स्त्री आणि पुरुष दोघेही वापरू शकतात. एंडोमेट्रियल जाडी वाढवण्यासाठी महिलांना कधीकधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर व्हायग्रादेखील दिला जातो.

व्हायग्रा

महिलांच्या शरीरात गर्भाशयाला रक्तपुरवठा करण्यासाठीही व्हायग्राचा वापर केला जातो. मात्र हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केले जाते.

प्रिस्क्रिप्शनशिवाय व्हायग्रा सहज उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचा गैरवापर होऊ शकतो. व्हायग्रामुळे धडधडणे सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. हे औषध खाण्यापूर्वी त्याचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सूचना - या लेखातील माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. हा कोणत्याही औषधोपचाराचा पर्याय असू शकत नाही. कोणत्याही औषधोपचारांसाठी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.