Acidity Remedies : किचनमधले 'हे' पदार्थ हिवाळ्यात अ‍ॅसिडीटीवर ठरतात गुणकारी

सध्याच्या या बदलत्या वातावरणात अ‍ॅसिडीटीची समस्या वाढते आहे. अशात तुमच्या किचनमधले पदार्थ तुम्हाला यातून सुटका देऊ शकतात.
Acidity Remedies
Acidity Remediesesakal
Updated on

Winter Acidity Remedies : हिवाळ्यात भूक वाढलेली असते आणि गार वातावरणामुळे सुस्तीवर वाढते. अशात ओव्हर इटिंग होऊन अ‍ॅसिडीटी वाढण्याची समस्या फार सामान्य झाली आहे. वाढता ताण हे देखील अ‍ॅसिडीटी वाढण्याचं कारण ठरतं. अशावेळी काही घरगुती उपायांनी अ‍ॅसिडीटी कमी करता येऊ शकते.

जाणून घेऊ उपाय

ओव्याचं पाणी

ओव्याच्या पाण्याने गॅसच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. यासाठी एक कप पाण्यात ओवा टाकून उकळवावे. ते पाणी गाळून प्यावे.

जिरे आणि काळं मिठ

भाजलेलं जीरे आणि काळं मिठ मिक्स करू खाल्ल्याने अ‍ॅसिडीटीची समस्या कमी होते.

Acidity Remedies
Gas-Acidity Remedy : न्यू इयर सेलिब्रेशनमध्ये खूप खाऊन झालीय ॲसिडीटी? 'हे' उपाय करा; त्रास लगेच दूर पळेल

आवळा

ज्यांना कायम अ‍ॅसिडीटीची समस्या असते त्यांनी आपल्या रोजच्या जेवणात आवळ्याचा समावेश करावा.

आले चहा

आल्याचा चहा हा अ‍ॅसिडीटीवर उत्तम उपाय आहे. पाण्यात नुसतं आलं उकळून ते पाणी प्यायलात तरी अ‍ॅसिडीटीवर त्याचा फायदा होतो.

Acidity Remedies
Delhi Acid Attack : चित्रपट पाहिला आणि आठवडाभर आधीच हल्ल्याचा प्लॅन केला!

पुदिना

पुदिना मुळात थंड असतो. यामुळे अ‍ॅसिडीटी कमी होते. छातीतली जळजळ कमी होते.

जिऱ्याचं पाणी

जिऱ्याचे गुण पचनासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन अ‍ॅसिडीटी कमी होते. आयुर्वेदात याला विशेष महत्व आहे. त्यामुळे जिऱ्याचं पाणी पिणं गुणकारी ठरू शकतं.

नारळ पाणी

पोटाच्या समस्या किंवा अ‍ॅसिडीटीवर नारळाचं पाणी गुणकारी ठरू शकतं. नारळ पाण्याने अपचनाची समस्या दूर होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.