हिवाळा आणि पाण्याचे सेवन

हवेतील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्वचा कोरडी होते. पारा खाली जाऊ लागतो आणि हवा थंड जाणवू लागते.
winter and water consumption health care in winter
winter and water consumption health care in winterSakal
Updated on

- अवंती दामले

हवेतील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्वचा कोरडी होते. पारा खाली जाऊ लागतो आणि हवा थंड जाणवू लागते. अशा हवेतल्या बदलांमुळे आपल्याला येणाऱ्या घामाचे प्रमाण घटते. थंड हवेमुळे तहानही लागत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतो. शरीरामध्ये झालेल्या डिहायड्रेशनमुळे :

१) त्वचा कोरडी पडते

२) भेगा पडतात

३) रोगप्रतिबंधक शक्ती कमी होते

४) मेंटल फॉग निर्माण होतो

५) शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते

६) बद्धकोष्ठता

७) ॲसिडिटी, जळजळ

८) सतत भुकेची भावना

९) मूड स्विंग

हिवाळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठीचे सोपे बदल.

१) दिवसाची सुरुवात करताना कोमट पाणी घ्यावे.

२) आहारामध्ये कढण, सूप, डाळीचे पाणी, ब्रॉथ, पेज यांचा समावेश करावा.

३) सुंठ, हळद त्यांचा वापर करून ताकाची कढी/मठ्ठा यांचा समावेश रोजच्या आहारात करावा.

४) हिवाळ्यात मिळणारी ताजी फळे, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल - उदाहरणार्थ, संत्री, स्ट्रॉबेरी यांचा आहारात समावेश करावा.

५) रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी काढा, ग्रीन टी यांचा समावेश करावा.

६) आहारात पालेभाज्यांचा वापर वाढवावा.

७) नाचणी, ज्वारी, शिंगाडा इत्यादींचे अंबील आहार घ्यावे.

८) हिटरचा वापर होत असल्यास त्वचेला कोरडेपणा येऊ नये म्हणून किमान १५-१६ ग्लास पाणी प्यावे.

हिवाळ्यातील पाककृती

कढण

साहित्य : मूग/ कुळीथ, मटकी - मोड आणून १ वाटी, अमसुले; जिरे, तूप, मिरची फोडणीसाठी.

कृती : मोड आलेली कडधान्ये प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावीत. त्यात दुप्पट पाणी व अमसुले मीठ खालून उकळावे व वरून तुपाची फोडणी द्यावी.

लेंटिल सूप

साहित्य : १ वाटी गाजर, टोमॅटो, लाल भोपळा, दुधी भोपळा, अर्धी वाटी मसूर डाळ

कृती : प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावे. त्यात दुप्पट पाणी घालून उकळावे व चवीपुरते मीठ आणि मिरपूड घालावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.