जसजसा हिवाळा ऋतू जवळ येतो, तसतसे हृदयविकाराच्या समस्या असलेल्यांना वाढीव जोखमीचा सामना करावा लागतो. त्यासंदर्भात मार्गदर्शन....डॉ. जी. व्ही. पी. रावसं पूर्ण हिवाळ्यात हृदयविकार आणि पक्षाघाताने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढते, असे संशोधनात दिसून आले. या काळात, हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त असते. जीवनशैलीतील बदल, जसे की खाण्याच्या अनियमित पद्धती, उशिरापर्यंत जागे राहणे आणि धूम्रपान, मद्यपान आणि तंबाखूचे सेवन यासारख्या बदलांमुळे, तसेच ताणतणावामुळे हृदयविकाराच्या घटना हिवाळ्यात वाढू शकतात. विशेषत: थंडी आणि पहाटेच्या वेळी आपल्या मज्जासंस्था अधिक सक्रिय होत असतात आणि तेव्हा नियमित हृदयतपासणी करणे अत्यावश्यक असते. प्रत्येकाने आणि विशेषत: जे वृद्ध आहेत किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी ज्यांना आजार आहेत, त्यांनी या काळात हृदयाचे आरोग्य गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे..हिवाळ्यात, शरीराची उष्णता टिकवून ठेवण्यासाठी हृदयावर कामाचा ताण वाढतो आणि जर शरीराचे तापमान ९५ अंश फॅरेनहाइटच्या खाली गेले तर ते हृदयाला हानी पोहोचवू शकते. हिवाळा ऋतू आपल्याला खूप जास्त मेहनत करण्यास प्रवृत्त करू शकतो, मग तो वेगाने चालणे असो किंवा वाहन ढकलणे किंवा अतिप्रमाणात व्यायाम असो. या श्रमामुळे हृदयाला ऑक्सिजनची गरज वाढते आणि अनेक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात. जसे की...१) रक्तवाहिन्यांसंबंधी ः थंड तापमानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर अधिक ताण येतो, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.२) ऑक्सिजनची वाढलेली मागणी : थंड वातावरणात जॉगिंग किंवा वेगवान चालणे व यांसारख्या इतर मैदानी खेळात भाग घेतल्यास हृदयाची ऑक्सिजनची मागणी वाढते. ज्यांच्या धमनी आधीच ब्लॉक आहे त्यांना याचा धोका होऊ शकतो.३) हायपोथर्मिया : थंडीत दीर्घकाळ राहिल्याने शरीराचे तापमान धोकादायकरीत्या कमी होऊ शकते, हृदयावर ताण येऊन त्याचे पंपिंग होणे थांबू शकते. अंग थरथरणे, थकवा येणे, ही हायपोथर्मियाची काही लक्षणे आहेत..४) इन्फ्लुएन्झा : तापामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि ऑक्सिजनची मागणी वाढते आणि डिहायड्रेशनमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.५) अंजायना : हृदयापर्यंत रक्तपुरवठा अपुरा झाल्यामुळे छातीत दुखणे, अस्वस्थता, छातीत घट्टपणा किंवा जडपणा, घाम येणे आणि श्वासोच्छवासाचा त्रास वाढू शकतो.६) सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर : सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे नैराश्य येऊ शकते, ज्यामुळे जीवनशैली बिघडते..हृदयाच्या आरोग्यासाठी व्यावहारिक कानमंत्र ः१) उबदार कपडे घाला : शरीराला कव्हर करणे आवश्यक आहे. घराबाहेर असताना तुमचे अंग टोपी, हातमोजे आणि स्कार्फने झाकलेले असल्याची खात्री करा.२) हुशारीने व्यायाम करा : नियमित शारीरिक हालचाल महत्त्वपूर्ण आहे, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा घरच्या घरी व्यायामाचा विचार करा.३) हृदयासाठी आरोग्यदायी आहार घ्या : तुमच्या जेवणात बीट, कोबी आणि गाजर यांसारख्या हंगामी भाज्यांचा समावेश करा. गरम सूप आणि वाफाळलेल्या भाज्या शरीराचे तापमान राखण्यासाठी उत्कृष्ट आहेत..४) हायड्रेटेड राहा : भरपूर पाणी प्या. कारण थंड हवामानामुळे तहान कमी होते व रक्त घट्ट होऊ शकते.५) तणाव व्यवस्थापित करा : योग, ध्यान यासारख्या तणाव कमी करणाऱ्या पद्धतींचा सराव करा६) अल्कोहोलचे प्रमाण मर्यादित करा आणि धूम्रपान टाळा : संयम आवश्यक आहे. याचे कारण या दोन्ही गोष्टी हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.(लेखक वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ सल्लागार आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.