डॉ. जागृती निकम
हिवाळा ऋतू हा लहान थोरांचा आवडता ऋतू आहे. थंडीसोबत हिवाळ्यात फ्लू व फ्लूसदृश आजारांना आमंत्रण मिळते. सीडीसीच्या सर्व्हेप्रमाणे सर्दी-खोकला हे मोठ्यांच्या कामावरील तसेच लहान मुलांच्या शाळेतील गैरहजेरीचे प्रमुख कारण आहे.
हिवाळ्यात मोठ्यांच्या तुलनेने लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असते. कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते, थंड हवामानामुळे वातावरणात विषाणू कायम राहतो. त्यामुळे लहान मुले सतत घरात असल्यामुळे त्यांना लागण लवकर होते. या लेखात आपण हिवाळ्यात होणारे आजार, लक्षणे, प्रतिबंधात्मक व इतर उपाययोजना जाणून घेऊया.