Winter Heart Care: हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. कारण बदलत्या वातावरणामुळे अनेक आजार निर्माण होऊ शकतात. यामध्ये खास करून हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. थंड हवामानामुळे रक्तवाहिन्या आंकुचन पावतात,ज्यामुळे रक्त परिसंचरण प्रभावित होते आणि हृदयावर दबाव वाढतो. या काळात हृदयाशी संबंधित समस्या वेळेत ओळखल्या नाहीत तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.
हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, पण हृदयविकाराची लक्षणे ओळखता आली तर वेळीच उपचार करता येऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. छातीत दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास, अत्यंत थकवा, घाम येणे आणि हृदयाचे ठोके बदलणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. यामुळे हिवाळा येण्यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याची काही महत्त्वाची लक्षणे ओळखणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकाल.