Winter Health Care: हिवाळा सुरू होताच अनेक लोक आंघोळीसाठी कोमट पाण्यासाठी गिझरचा वापर करतात. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने सर्दी, खोकला दूर राहते. पण तुम्हाला माहिती आहे का गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
पण हिवाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ केल्यास शरीराला आराम मिळतो.तसेच थंडीपासून बचाव होतो. पण हिवाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ केल्यावर शरीराचे तापमान अचानक कमी होऊ शकते.
आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, हिवाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शारिरीक आराम मिळतो आणि फ्रेश वाटते. पण त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. अन्यथा शरीराला पुढील समस्यांना सामोरे जावे लागू शकते.