Winter Health Care: बदललेले वातावरण, व्हायरल इन्फेक्शन, वातावरणात ॲलर्जीक घटकांची झालेली वाढ आणि गणेशोत्सवामध्ये संसर्गाची झालेली देवाण- घेवाण या कारणांमुळे लहान मुलांमध्ये खोकल्याचे प्रमाण वाढलेले आहे. काही वेळेस हा खोकला औषधे घेऊनही बरा होत नाही. त्यामुळे दोन-दोन आठवडे औषधे घ्यावी लागतात. तसेच, रात्रीच्या वेळी या खोकल्याची उबळ जास्त जाणवते. हा ब्रॉंकायटिस म्हणजे न्युमोनियासदृश्य खोकला आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता उपचार घ्यावेत, तसेच खोकला होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी, असे अवाहन बालरोगतज्ज्ञ तसेच फुप्फुसविकारतज्ज्ञांनी केले आहे.