Men Fertility : पुरुषांनो, हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करता? शुक्राणूवर होऊ शकतो गंभीर परिणाम

गरम पाण्याने अंघोळ केल्याने पुरुषांच्या फर्टीलिटीवर परिणाम होतो?
Male Fertility
Male Fertilitysakal
Updated on

हिवाळा आला की सगळीकडे थंडीचे वातावरण असते. अशात शक्य होईल तितकी ऊब मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. शेकोटी समोर बसणे, हीटरचा वापर करणे, ब्लॅकेंट आणि शॉल चा वापर करणे, एवढंच काय तर गरम पाण्याने आपण अंघोळ सुद्धा करतो. पण तुम्हला माहिती आहे का, गरम पाण्याने अंघोळ केल्याने पुरुषांच्या फर्टीलिटीवर परिणाम होतो? हो, हे खरंय. आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. (winter season bathing with hot water will affects on fertility of men)

बऱ्याचदा पुरुषांमध्ये इंफर्टिलिटीची समस्या प्रामुख्याने दिसून येते. सध्या वंध्यत्वाच्या प्रकरणांपैकी 40-50 टक्के प्रकरणे हे पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता योग्य नसल्यानेही समोर आले.

युनिव्हर्सिटी ऑफ अर्कान्सास फॉर मेडिकल सायन्स च्या युरोलॉजी विभागातील एका ताज्या रिपोर्टनुसार गरम पाण्यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. गरम पाण्याच्या संपर्कात राहिल्यास पुरुषांची शुक्राणूंची संख्या सामान्य होण्यासाठी किमान सहा महिने लागतात ज्यामुळे फर्टिलिटीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Male Fertility
Indian Men : कमी होताय भारतीय पुरुषांचे शुक्राणू, संशोधनातून समोर

जेव्हा अंडकोषाचे तापमान हे सामान्य बॉडीच्या तापमानापेक्षा चार अंश सेल्सिअस कमी असते. तेव्हाच शुक्राणू तयार होऊ शकतात. त्यात तुम्ही गरम पाण्याने अंघोळ केली तर शरीराचे तापमान आणखी वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे शुक्राणूवर गंभीर परिणाम होतो.

Male Fertility
कोरोनामुळे पुरुषांचे Sperm cells होतात कमी; काय आहे नेमकं कारण, जाणून घ्या

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.