Winter Tips: आरोग्यदायी मोहरीच्या तेलाचे ‘हे’ आहेेत फायदे; तुमचे केस आणि त्वचा दोन्ही ठेवते तंदुरुस्त

मोहरीच्या तेलामधुन मिळणारे नैसर्गिक फॅट्स हे केसांना चांगले फायबर मिळवून देण्याचे काम करते.
mustard oil
mustard oilEsakal
Updated on

mustard oil: मोहरीच्या तेलाचा उपयोग हा अनादी काळापासूनच स्वयंपाकघरात होत आला आहे. याचे कारण म्हणजे मोहरी तेलाचे आरोग्यदायक फायदे अनेक आहेत. हिंदीमध्ये याला सरसों का तेल म्हटले जाते तर मराठीत आपण मोहरीचे तेल म्हणतो. मोहरीच्या तेलाचा उपयोग हा सर्वात जास्त खाद्यपदार्थ बनविण्यासाठी करण्यात येतो. हे आपल्याला प्रत्येकाला माहीतच आहे. पण मोहरीचे तेल हे केवळ याच कामासाठी मर्यादित नाही, तर याचा उपयोग तुम्ही आरोग्यासाठी करून घेऊ शकता. शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. 

मोहरीच्या झाडाच्या बियांपासून हे मोहरीचे तेल काढले जाते. हे मसालेदार तेल भारतीय  आणि नेपाळी खाद्यापरंपरेचा प्राण मानले जाते. काही लोक केसांची निगा राखण्यासाठी आणि देखभालीसाठी या तेलाचा वापर करतात. मोहरीचे तेल हे अनेक प्रकारचे असते. परंतु, मुख्य रुपात काळी मोहरी, पिवळी मोहरी आणि पांढरी मोहरी यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. 

आजच्या लेखात मोहरीच्या तेलाचे कोणकोणते फायदे आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

जर तुम्ही पहिल्यांदा त्वचेवर अथवा डोक्याच्या टाळूवर मोहरीचे तेल किंवा मस्टर्ड ऑईल लावत असाल तर त्यापूर्वी पॅच टेस्ट जरुर करा. पॅच टेस्टकरता तेलाच्या थेंबाला मनगट किंवा हातावरील भागावर लावून पहा. तेल लावल्यानंतर 24 तासांनी जर तुमच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचा लालसरपणा, जळजळ किंवा सूज आली नसेल तर या तेलाचा वापर करणे हे सुरक्षित मानले जाऊ शकते.मोहरीच्या तेलामध्ये नैसर्गिक रित्या फॅट्सचे प्रमाण भरपूर असते. या फॅट्समुळेच हे केसांच्या कंडीशनरकरता खूप प्रभावशाली मानले जाते.

mustard oil
Winter Tips: हिवाळ्यात उबदार कपड्यांची निगा कशी राखावी?

मोहरीचे तेल केसांना लावल्यामुळे केसांच्या मुळांमध्ये जाऊन चांगले पोषण देते. याला हेअर मास्कसारखे लावले जाऊ शकते.मोहरीच्या तेलामध्ये मिळणारे नैसर्गिक फॅट्स हे केसांना चांगले फायबर मिळवून देण्याचे काम करते. यामुळे तुमच्या केसांवर बाहेरील प्रदूषणाचा कोणताच परिणाम होत नाही. मोहरीचे तेल डोक्याला लावल्यामुळे तेथील त्वचेला खाज येण्याच्या समस्येपासून तुमची सुटका होऊ शकते. डोक्यावर हे तेल लावल्याने तुमच्या केसांना वॉर्मिंगचा प्रभाव जाणवतो. तसेच मसल्सचा त्रास दूर करण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय म्हणून या तेलाचा वापर केला जात आहे.

mustard oil
Winter Recipe: मेथीचे पौष्टीक लाडू कसे तयार करायचे ?

मोहरीमध्ये देखील मिरचीप्रमाणेच एंटी इंफ्लेमेट्री, दुखणे, जळजळ आणि खाज येण्यापासून सुटका मिळवून देणारे गुण सापडतात. हेच कारण आहे की, डोक्यातील काही गंभीर समस्यांवर जसं की, डर्मेटायटिस एग्जिमा सोरायसिस मुरुम येण्याची समस्या या सर्व समस्यांवर मोहरीच्या तेलाचा वापर केल्याने अनेक चमत्कारिक फायदे मिळतात. मोहरीच्या तेलामध्ये अनेक जंतूविरोधी पदार्थ आणि एंटीफंगल गुण मिळतात. या तेलाच्या नियमित वापरामुळे डोक्यामध्ये होणारा कोंडा रोखण्याकरता मदत मिळू शकते.

या व्यतिरिक्त यीस्टच्या वाढीमुळे होणारी केसांची समस्या किंवा डोक्यात होणारा एक्ने किंवा मुरुमांची समस्या दूर करण्यात देखील मोहरीचे तेल अतिशय फायदेशीर आहे. या तेलामुळे डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी मदत मिळू शकते.

mustard oil
Winter Recipe: घरच्या घरी बनवा अगदी रेस्टॉरंट सारखे चवदार टोमॅटो सूप...

मोहरीच्या तेलाला तुम्ही डोक्यात होणाऱ्या स्काल्पच्या समस्यांवर किंवा त्याच्याशी निगडीत समस्यांवर उपचार करण्याकरता देखील वापरु शकता. डोक्यातील स्काल्पच्या समस्यांवर मोहरीच्या तेलाचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला त्या करता तेल हातावर घेऊन चार ही बोटांनी केसांना लावावे लागेल. बोटांना लावलेले हे तेल केसांमध्ये चांगल्या प्रकारे लावा. पूर्ण स्काल्पमध्ये हे तेल चांगल्या प्रकारे लावल्यानंतर जवळपास 1 तासापर्यंत ते तेल तसेच लावून ठेवा. त्यानंतर तुम्ही केसांना शाम्पू लावून केस चांगल्या प्रकारे धुवू शकता. त्यामुळे तुमच्या केसातील स्काल्पमध्ये असलेले अतिरिक्त तेल निघून जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.