Winter Tips : हिवाळ्यात दुधात तुळशीचे पाने उकळून पिण्याचे काय आहे फायदे?

तुळशीच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
Tulsi Winter Tips
Tulsi Winter TipsEsakal
Updated on

तुळशी ही केवळ आपल्यासाठी एक वनस्पती नसून ती आपल्या अध्यात्माचा एक भाग मानली जाते. हिंदू संस्कृतीत तुळशीला पूजनीय मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार ज्या घरामध्ये आणि अंगणात तुळशी असते तिथे रोग आणि जीवाणू येत नाहीत. तसेच, तुळशीच्या औषधी गुणधर्मामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.तुळशीच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, झिंक आणि लोह इ. गोष्टी असतात, यासोबतच तुळशीमध्ये सायट्रिक, टार्टरिक आणि मॅलिक अ‍ॅसिड आढळते.

तुळशीची पाने दुधात उकळल्याने अनेक मोठे आजार दूर होतात. मात्र, हे दूध केव्हा आणि कसे प्यावे ते जाणून घेणे गरजेचे आहे. तुळशीची पाने अनेक गुणांनी समृद्ध असतात. कोणत्याही प्रकारे तुळशीचा वापर करा, त्याचा आरोग्याला फायदाच होतो. तसे, आपल्याला रोगामध्ये तुळशीची पाने कशी वापरायची हे माहीत आहे. पण तुम्हाला माहिती आहे काय, तुळशीची पाने रोज दुधात उकळवून प्यायल्यास या मोठ्या आजारांपासून सहज मुक्तता मिळते. 

आजच्या लेखात आपण हिवाळ्यात दुधात तुळशीचे पाने उकळून पिण्याचे फायदे काय आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Tulsi Winter Tips
Winter Recipe: मेथीचे पौष्टीक लाडू कसे तयार करायचे ?

1) अर्धडोकेदुखी कमी होते.

तुळशीची पाने दुधात उकळवून प्यायल्याने डोकेदुखी किंवा मायग्रेनसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तुळशीच्या दुधाचे नियमित सेवन केल्यास ही समस्या मुळापासून दूर होते

2) रोग प्रतिकारशक्ती वाढते.

तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांच्या असल्यामुळे ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. याशिवाय तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टीरियल आणि अँटीवायरल गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला सर्दी, खोकला आणि सर्दीपासून दूर ठेवता येते.

Tulsi Winter Tips
Winter Recipe: जवसची खमंग चटणी कशी तयार करायची?

3) नैराश्य दूर होते .

आपल्याला रोजच्या दैनंदिन कामात आणि कार्यालयीन ताणामुळे किंवा कामाच्या ओझ्यामुळे जर आपण बर्‍याचदा ताणाव किंवा नैराश्यात असतो. त्यावेळी तुम्ही जर तुळशीची पाने दुधात उकळून प्या. त्यामुळे तुमचा मानसिक तणाव आणि चिंता दूर होतात.

4) तुळशीचे दूध हे दमा आजारावर रामबाण उपाय आहे.

श्वासोच्छवासाची समस्या, दमा यासारख्या आजाराने तुम्हाला त्रास होत असेल तर तुळशीची पाने दुधात उकळवून घ्या. असे केल्याने दम्याचा रुग्णांना या फायदा होईल. श्वास घेण्याचा त्रासही कमी होतो.

Tulsi Winter Tips
Winter Recipe: पौष्टिक बीटरुटचे लाडू कसे तयार करायचे?

5) मूतखड्याची समस्या दूर होतेजर एखाद्या व्यक्तीला मूतखड्याचा त्रास असेल तर त्याने रिकाम्या पोटात नियमितपणे तुळशीचे दूध प्यावे. असे केल्याने मूत्रपिंडातील मूतखड्याची समस्या दूर होतेच, शिवाय वेदना दूर होतात.

आता बघू या तुळशीच्या दुधाचे सेवन कसे करावे?

तुळशीचे दूध करण्यासाठी प्रथम दीड ग्लास दुधात 8 ते 10 तुळशीची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घालावी आणि उकळी येऊ द्यावी. दूध एक ग्लास होईलपर्यंत त्याला उकळी येऊ द्या, त्यानंतर गॅस बंद करा. दूध किंचित कोमट झाल्यावर ते प्या. या दुधाचे नियमित सेवन केल्यासच या आजारांपासून मुक्तता मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.