वजनाने केली शंभरी पार; बारीक होण्यासाठी या महिलेने काय केले पाहा...

"दोन अंकी वजन ही सामान्य गोष्ट आहे; पण माझे वजन तीन अंक झाले तेव्हा मी ते कमी करण्याचा निर्णय घेतला", असे शिल्पा सांगतात.
weight
weightgoogle
Updated on

मुंबई : दुबईला राहणाऱ्या आहारतज्ज्ञ शिल्पा कंसल यांचे वजन १०२ किलोपर्यंत वाढले होते. त्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. म्हणून त्यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. योग्य आहार आणि व्यायामाच्या बळावर त्यांनी ४६ किलो वजन कमी केले. हे सर्व कसे शक्य झाले पाहू या....

weight
सरावाइतकाच आहार महत्वाचा ः डॉ. मोरबाळे

शिल्पा या ३९ वर्षीय असून त्या फिटनेस अॅड न्यूट्रिशन कंसल्टंट आणि बॉक्सफिटमध्ये रिक्रूटमेंट हेड आहेत. "दोन अंकी वजन ही सामान्य गोष्ट आहे; पण माझे वजन तीन अंक झाले तेव्हा मी ते कमी करण्याचा निर्णय घेतला", असे शिल्पा सांगतात.

weight
Diet Tips: या गोष्टी जास्त प्रमाणात खाल्ल्याने मुलांना येऊ शकतो लठ्ठपणा

वजन कमी करण्यासाठी शिल्पा यांनी आहार कसा घेतला ?

१. नाश्ता

नाश्ता केला नाही.

२. दुपारचे जेवणे

चिकन पुलाव/ पनीर पुलाव

३. रात्रीचे जेवण

अंड्याचा पराठा

४. व्यायामाच्या आधीचा आहार

ब्लॅक कॉफी

५. व्यायामाच्या आधीचा आहार

व्हे प्रोटीन आइसोलेट आणि २० ग्रॅम काजू

६. कमी कॅलरीचा आहार

व्हे प्रोटीन, आइस्क्रीम, अंडे आणि पनीर टॉर्टिला रॅप, पालक पनीर पुलाव

weight
वाढता लठ्ठपणा मधुमेह वाढविण्यास कारणीभूत

व्यायाम

शरीराचा खालचा भाग बळकट करण्यासाठी शिल्पा यांनी स्ट्रेन्थ ट्रेनिंग केले. त्याच वेळी शरीराच्या वरच्या भागासाठी उपयुक्त असा व्यायामही केला. शिल्पा यांचे म्हणणे आहे की, सुदृढ राहाणे सोपे आहे. विनाकारण ही गोष्ट कठीण करून ठेवू नये.

लठ्ठपणाचा धोका काय ?

लठ्ठपणामुळे विविध आजारांचा धोका निर्माण होतो. चालणे-फिरणे आणि दैनंदिन कामे करणे कठीण होते. यामुळे तुमच्या जीवनशैलीची गुणवत्ता ढासळते.

सुदृढतेचा कोणताही सोपा मार्ग नसतो. फक्त सुंदर दिसण्यासाठी तुम्ही व्यायाम करत असाल तर फार कमी वेळात तुम्ही व्यायाम करणे सोडाल. वजन कमी करण्यासाठी बराच काळ संयम ठेवणे आवश्यक आहे. आहाराचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.