Women Health : महिला घरची कामं करत त्यांचं घर आणि नोकरी दोन्ही गोष्टी सांभळतात. मात्र हे करत असताना बरेचदा त्याचं स्वत:च्या आरोग्याकडे दूर्लक्ष होतं. महिलांच्या आरोग्याविषयी एक मोठी बातमी पुढे येतेय. मुंबईतल्या 63 टक्के महिलांची हाडं (Bones) कमकुवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. येथे पाचपैकी तीन महिला ऑस्टियोपेनियाने (Osteopenia) ग्रस्त आहेत.तर चौघींपैकी एकीला ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis)असल्याचं निदान झालंय. या दोन्ही आजारांत हाडांची घनता कमी होते. जाणून घेऊया याबाबत सविस्तर.
फ्रॅक्चर, तीव्र वेदना होणं आणि हालचाली कमी होण्याचा धोका महिलांमध्ये वाढू शकतो. ऑस्टिओपोरोसिसमुळे मणक्याच्या फ्रॅक्चरचा (Spine Fracture) धोका वाढतो तसंच श्वासोच्छ्वासावरही परिणाम होऊ शकतो.. यात हाडं कमकुवत आणि ठिसूळ होतात, त्यामुळे ती तुटण्याची शक्यता वाढते.
ऑस्टिओपोरोसिस म्हणजे नेमकं काय?
ऑस्टिओपोरोसिसमध्ये महिलांची हाडं कमकुवत आणि ठिसूळ होऊन तुटण्याची शक्यता असते. महिलांमध्ये मणक्याच्या फ्रॅक्चरचा धोका वाढतो. धक्कादायक म्हणजे मुंबईत 4 पैकी एका महिलेला ऑस्टिओपोरोसिस ग्रस्त आहेत. ऑस्टियोपोरोसिस हा आजार प्रामुख्याने स्त्रीयांना मेनोपॉजनंतर (Menopause) आणि वयाची साठी उलटून गेलेल्या पुरूषांमध्ये दिसून येतो. ऑस्टियोपोरोसिसचा सर्वात जास्त परिणाम पाठीचा कणा, खुबा आणि मनगटाची हाडे यांवर होतो.
ऑस्टियोपोरोसिस कसा ओळखावा?
ऑस्टियोपोरोसिस ओळखण्यासाठी काही चाचण्या असतात. बोन डेन्सिटोमेट्रो चाचणी (Bone Densitometer Test), सिरम कॅल्शियम (Serum Calcium), व्हिटॅमिन डी (Vitamin D), तसंच टी 3, टी 4 टीएस, एच इस्ट्रोजन (H Estrogen), टेस्टोटेरॉन (Testosterone) यांसारख्या काही रक्तचाचण्यांनंतर या आजाराचं निदान होतं . महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर किंवा साधारणपणे वयाच्या पंचेचाळीशी नंतर आणि पुरुषांमध्ये 60 वयानंतर दर पाच वर्षांनी ही चाचणी घेणं आवश्यक आहे.
ऑस्टियोपेनिया म्हणजे काय?
ऑस्टियोपेनियामध्ये हाडांच्या कमकुवतपणाचा सौम्य प्रकार. उपचार न केल्यास ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असते. मुंबईत पाचपैकी तीन महिलांना ऑस्टियोपेनियाने ग्रासलं आहे.
महिलांना वरील कुठलाही त्रास उद्भवण्याआधी करा हे उपाय?
महिलांनी जास्तीत जास्त कॅल्शियम (Calcium) आणि व्हिटॅमिन D (Vitamin D) युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. वेळोवेळी शरीरातील कॅल्शियम तपासत राहा, याशिवाय कॅल्शियम मिळण्यासाठी सकाळी उन्हात जा, वजन नियंत्रित ठेवल्यानं पाठदुखीवर आराम मिळेल. तसंच नियमित योगासन आणि व्यायाम करावा. दररोज मान आणि कंबरेचा व्यायाम करा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किमान तीन ते चार किलोमीटर पायी चाला. कॅल्शियम बरोबरच आहारात प्रोटीनचा समावेश तितकाच महत्वाचा आहे कारण प्रोटीनच्या कमतेरमुळे हाडे ठिसूळ होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.